असतं एकेकाचं नशीब….!…राजकारणात आले, आणि…

समाजकारण सोडून राजकारणात (Political)आले, पक्षासाठी थोडेफार काम केले आणि एकदम महत्त्वाची पदे मिळत गेली, याला नशीब असे म्हणतात. महाराष्ट्राच्या राजकारणात हे असं घडत आलेले आहे आणि आजही घडताना दिसत आहे.अजितदादा पवार हे इसवी सन 1990 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढले आणि पहिल्याच प्रयत्नात जिंकले.


खासदारकीची मुदत संपल्यानंतर ते विधानसभेवर निवडून जात राहिले. इसवी सन 2004 मध्ये काँग्रेस पेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या जास्त जागा जिंकल्या होत्या. (Political)मुख्यमंत्रीपद त्यांना मिळणार होते तथापि दोन जादा मंत्रिपदे घेऊन शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेस कडे दिले. तेव्हा अजित दादा पवार हे कदाचित मुख्यमंत्री बनले असते. पण त्यांना उपमुख्यमंत्री व अर्थ खात्याचा कार्यभार मिळाला.
त्यानंतर ते प्रत्येक मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले. गुरुवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या शपथविधी सोहाळ्यात त्यांनी सातव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा द्वारा उपमुख्यमंत्री म्हणून
शपथ घेऊन आमची राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र अशी एक विचारधारा आहे असे त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलेले दिसते.
देवेंद्र फडणवीस हे हे इसवी सन 1999 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आले. आमदार झाले. आणि 2014 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. गुरुवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा ईश्वर साक्ष शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

एकनाथ शिंदे हे 1980 मध्ये शिवसेनेत सामान्य शिवसैनिक म्हणून दाखल झाले. इसवी सन 2004 मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते पाचव्यांदा विधानसभेवर निवडून गेले. इसवी सन 2022 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्याकडे 41 आमदारांचे संख्याबळ होते.
शिवसेनेला खिंडार पाडून त्यांनी 40 पेक्षा अधिक आमदार सोबत घेऊन ते भाजपच्या प्रभावाखाली आले आणि त्यांना भाजपने मुख्यमंत्री पदावर विराजमान करून सर्वांनाच चकित करून सोडले होते. आता त्यांनी गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
उपमुख्यमंत्री पद हे हे संविधानाने मान्य केलेले पद नाही. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी नंतरच्या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांचे चिरंजीव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि नंतर कॅबिनेट मंत्री होते. उपमुख्यमंत्री हे घटनात्मक नाही पण तरीही काँग्रेस पक्षांने या पदाची निर्मिती केली.
एकूणच राजकारणात कुणाचे नशीब फळफळेल
हे सांगता येत नाही. वेळेच्या आधी आणि नशिबात लिहिलेल्या पेक्षा जादा काही मिळत नाही असे म्हणतात.

भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रीय पातळीवर दीर्घ काळ काम केलेले कितीतरी वरिष्ठ नेते होते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी वगैरे नेते पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ शकले असते तथापि गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेल्या नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि 2014 मध्ये ते पंतप्रधानही बनले. याच 2024 मध्ये त्यांनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तीन वेळच्या पंतप्रधान पदाची बरोबरी केली.

अजित दादा पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्री पदाची अपेक्षा व्यक्त केली होती शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची डिजिटल पोस्टरही लावली होती. शरद पवार यांच्या मनात आले असते तर ते 2004 मध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले असते पण हा योग काही जुळून आला नाही कारण शरद पवार यांचे राजकारण होय. मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केलेली नव्हती मात्र भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली तेव्हा महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला होता.

हेही वाचा :

“दुसऱ्याच दिवशी मोठा निर्णय: राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, आज राजभवनात शपथविधी”

आजचे राशी भविष्य

लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी येणार? अर्ज छाननीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान!