व्हॉट्सॲपवर कॉल करत असाल तर सावध व्हा कारण त्यावरून तुमचे लोकेशन ट्रॅक केला जाऊ शकते. तुमच्या फोनवरील लोकेशन बंद असले तरीही, एका साध्या सेटिंगच्या मदतीने हॅकर्सना तुमचा लोकेशन मिळवता येतो. व्हॉट्सॲप (security)हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप असून, भारतात याचे ५५० दशलक्षांहून अधिक वापरकर्ते आहेत. चॅट, ऑडिओ व व्हिडिओ कॉलसाठी वापरले जाणारे हे अॅप सुरक्षित असल्याचा दावा करते. मात्र, सायबर घोटाळ्यांबाबत सतत तक्रारी येत आहेत.
व्हॉट्सॲप (security)कॉल्सच्या वेळी तुमचा लोकेशन ट्रॅक केला जाऊ शकतो, ही एक महत्त्वाची समस्या आहे. यावर तोडगा म्हणून व्हॉट्सअॅपने “Protect IP Address in Calls” नावाचे फीचर उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर सुरू केल्याने कॉल दरम्यान तुमचा आयपी अड्रेस लपवला जातो आणि लोकेशन सुरक्षित राहते.
हे फीचर कसे सुरू कराल?
- व्हॉट्सॲप उघडा.
- वरती उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा.
- “Settings” पर्याय निवडा आणि “Privacy” सेक्शनमध्ये जा.
- “Advanced” या पर्यायावर क्लिक करा.
- “Protect IP Address in Calls” हे फीचर ऑन करा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमचा आयपी अड्रेस सुरक्षित होईल आणि तुमचा लोकेशन ट्रॅक करणे कठीण होईल.
याशिवाय, व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणत आहे, ज्यामुळे चॅनेल्स जॉइन करणे खूप सोपे होईल. सध्या चॅनेल शोधण्यासाठी लिस्टमध्ये शोधावे लागते. मात्र, या नव्या फीचरमुळे प्रत्येक चॅनेलला एक QR कोड मिळेल. हा कोड स्कॅन करून युजर्स एका क्लिकवर चॅनेल जॉइन करू शकतील.
ही सुविधा लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या फीचरमुळे चॅनेल्सचा वापर अधिक सुलभ होईल आणि चॅनेल ग्रोथ वाढेल, असा व्हॉट्सअॅपचा दावा आहे.
हेही वाचा :
लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले नागा चैतन्य आणि शोभिता, Video Viral
भारताला धक्का, टीम इंडिया 180 धावांवर ऑलआऊट…
अभ्यास सोडून तरुणीच्या डोक्यातील काढतोय उवा; Viral Video