विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडी(political news) आता आगामी महानगर पालिका निवडणुकीकडे वळली आहे. यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा ‘हिंदुत्वा’चा नारा दिला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा, असे आदेश पदाधिकारी व माजी नगरसेवकांना दिले आहेत.
ठाकरे (political news)गटाची नुकतीच यासंबंधी बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि लढत राहील असा नारा दिलाय. लोकसभेत शिवसेना (ठाकरे) हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार करण्यात आला, असं पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत स्पष्ट केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपली रणनिती बदलली आहे.
लोकसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेला 20 च्या पुढेही आकडा गाठता आला नाही. या पराभवानंतर महाविकास आघाडी आता टिकणार नाही, असे दावे राजकीय वर्तुळात करण्यात आले. इतकंच नाही तर, या महापालिका निवडणुकीपूर्वीच मविआत बिघाडी होणार, असंही बोललं जातंय.
अशात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणल्याने त्यांचा मित्र पक्ष असलेला कॉँग्रेस गट नाराज झाला आहे. झालं असं की, शिवसेनेचे (ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी काल (6 डिसेंबर) एक्सवर एक पोस्ट केली. बाबरी मशिद विध्वंसाला काल 32 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर त्या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट नार्वेकरांनी एक्सवर केली होती.मात्र, याच पोस्टवर कॉँग्रेसचे रईस शेख यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केलीये.
त्यांनी एक्सवर पोस्टदेखील लिहिली आहे. “आपल्याला आठवण करून देतो की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मागील दोन निवडणुकांमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो.”,असं कॉँग्रेसचे नेते रईस शेख म्हणाले आहेत.
त्यांची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे हिंदुत्वाच्या मुद्दयावरून कॉँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपली असल्याचं म्हटलं जातंय. या दोन्ही पोस्ट आता व्हायरल झाल्या असून राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीत आता बिघाडी होणार का?, याबाबतही आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य कसं संपलं? भाजपकडून कोणती आश्वासनं देण्यात आली?
नाटकबाजी बंद करा अन् मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काम करा, अन्यथा…जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा
व्हॉट्सॲप कॉल वरून काढता येतं तुमचं लोकेशन; पटकन बदला ही सेटिंग, नाहीतर होईल पश्चाताप