आठवड्याच्या शेवटी गुड न्यूज; तब्बल ‘इतक्या’ हजारांनी सोनं झालं स्वस्त

या महिन्यापासून लग्न सराईला सुरुवात झाली आहे. या काळात वर आणि वधूकडून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते. या आठवड्यात ग्राहकांना मौल्यवान धातू सोन्याने मोठा दिलासा दिला आहे(Good news). या वर्षाअखेर दोन्ही धातुमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे.

या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसले. सोमवारी सोने 650 रुपयांनी स्वस्त झाले. तर मंगळवारी सोने 430 रुपयांनी महागले. बुधवारी सोन्याच्या किमतीमध्ये कोणताच बदल दिसून आला नाही. तर गुरूवारी 110 रुपयांनी त्यात दरवाढ झाली. काल 6 डिसेंबर रोजी सोन्यात 250 रुपयांची घसरण झाली. तर, आज 7 डिसेंबररोजी सकाळच्या सत्रात देखील सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत(Good news).

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मागील आठवड्यात चांदीत जितकी उसळी आली. तितकीच घसरण झाली. सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यानंतरच्या दोन दिवसांत चांदीला आघाडी घेता आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 76,187, 23 कॅरेट 75,882, 22 कॅरेट सोने 69,787 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,140 रुपये, 14 कॅरेट सोने 44,569 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.

हेही वाचा :

हिंदुत्ववादावरून ठाकरे गट-कॉँग्रेसमध्ये जुंपली, ट्वीटरवर मोठा राडा

एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य कसं संपलं? भाजपकडून कोणती आश्वासनं देण्यात आली?

व्हॉट्सॲप कॉल वरून काढता येतं तुमचं लोकेशन; पटकन बदला ही सेटिंग, नाहीतर होईल पश्चाताप