निवडणुकीत जेव्हा महाविकास (Political)आघाडीच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगल्या असतात. पण जेव्हा निकाल विरोधात लागतो तेव्हा मविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याची ओरड सुरु होते. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे आता त्यांनी ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते रविवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मविआच्या नेत्यांवर सडकून टीका केली. झारखंडमध्ये मतदान झालं, कर्नाटकात मतदान झालं, लोकसभा (Political)निवडणुकीत मतदान झालं, प्रियांका गांधी जिंकल्या. पण जेव्हा पराभव झाला तेव्हा मविआने ईव्हीएम घोटाळा म्हणायला सुरुवात केली. दुसरं कोणी जिंकलं की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायची मागणी करायची. विरोधी पक्षाकडे आता मुद्दा राहिलेला नाही. विरोधी पक्षाला जनतेने चारीमुंड्या चीत केले आहे. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाहीत, फिल्डवर काम करणाऱ्यांना मतदान करतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह महायुतीला लगावला.
मी शरद पवारांचं वक्तव्य ऐकलं. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांची तुलना केली. काँग्रेसला जास्त मतं मिळूनही शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या, असे ते म्हणाले. पण लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये अवघ्या काही टक्क्यांचा फरक होता. तरीही मविआला 31 आणि महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 100 जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने 80 जागा लढवल्या होत्या. प्रत्येक मतदारसंघाचे गणित वेगळे असते. तुमचा विजय होतो, जागा जास्त, तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली. पराभव होतो, तेव्हा ईव्हीएम खराब. बाजूने निकाल लागल्यावर सुप्रीम कोर्ट चांगलं, विरोधात निकाल लागल्यावर मविआच्या नेत्याने न्यायालयावरही आक्षेप घेतला, याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगाने विकास केला आणि अनेक योजना आणल्या. त्याची पोचपावती जनता आम्हाला देईल, हे मी सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत तसेच घडले. त्यामुळे आता महाविकास आघाडीने ईव्हीएमचे रडगाणे थांबवावे आणि विकासाचे गाणे गायले पाहिजे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला. नाना पटोले 200 मतांनी जिंकले, रोहित पवार 1100 मतांनी जिंकले, मग काय म्हणायचं? कोणी काही करु शकतं का? संविधान आहे, लोकशाही आहे. जनमताचे स्वागत केले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
हेही वाचा :
मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? आठवलेंचा सवाल
मोठी बातमी! मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण; बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप
शरद पवारांसमोरच महिलांचा एल्गार; म्हणाल्या, मारकडवाडीतल्या ठिणगीचा वणवा देशात पेटणार