पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या(political news)विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला. तर, लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय, गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा, असंही अजित पवार म्हणालेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा (political news)अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतो. नेतृत्त्व गुणांची त्यांची ही पोचपावती आहे. तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून झाली. तुम्हाला लोकसभा निवडणूकीत तुम्ही उभं रहा, जर अपयश आलं तर तुम्हाला या सभागृहात संधी देऊ, असं मी म्हटलं होतं. मी तुम्हाला इकडे आणले आणि देवेंद्र फडणवीस हे तु्म्हाला तिकडे घेऊन गेले असंही अजित पवार म्हणालेत.
निवडणूक काळात काही लोक संविधान हातात घ्यायचे. मात्र, संविधान हातात घेतलं की, आदर वाढतो. म्हणजे बाकीच्यांना आदर नाही का? एकनाथ शिंदे म्हणाले की कोर पान होती. त्यात मला जायचे नाही, असे त्यांनी म्हटले. तर विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेतली नाही.
यावरून अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘मी म्हटलं होतं की आज नाही शपथ घेतली तर उद्या घेतील आणि तसेच झाले. निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. काही तरी स्टंटबाजी करायची. आम्हाला ही मारकडवाडी संदर्भात आदर आहे. लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला.
लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय गरम वाटतंय की कसं तुम्ही बघा, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीला डिवचले. 237 महायुतीचे निवडून आले. कधीही ही एवढे निवडून आले नाही. आता तरी डोळे उघडा. लाडक्या बहिणींनी आम्हाला इथं बसवलंय, असंही अजित पवार यावेळी म्हणालेत.
हेही वाचा :
नागार्जुनने सूनेसोबत मंदिरात असं काय केलं की…Video
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत उभी फूट? ‘ही’ बाब ठरतीये चर्चेचं कारण…
प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी