पोलीस दलातील भ्रष्टाचार मीरा बोरवणकरांच चिंतन

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पोलीस(police) प्रशासन आणि भ्रष्टाचार यांना वेगवेगळे करता येणार नाही, इतक्या गंभीर वळणावर परिस्थिती गेली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनच चक्क गृहमंत्रीच तुरुंगात गेले होते. तेव्हा पोलीस दलातील भ्रष्टाचाराविषयी पहिल्यांदाच जाहीरपणे चर्चा झाली होती.

आता तर निवृत्त आयपीएस अधिकारी श्रीमती निरांबरोबर यांनी पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचारावर कठोर भाष्य केले, पण त्यावर कठोर उपाय योजना त्यांनी सांगितलेल्या नाहीत. पोलिसांविषयी असामाजिक घटकांच्या मनात भीती असायला हवी आणि सामान्य माणसाच्या मनात आदर असायला हवा. पण नेमके उलटे घडते आहे आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे पोलीस प्रशासनात वाढलेला भ्रष्टाचार होय.

समिती मीरा बोरवणकर यांना नुकताच छत्रपती संभाजी नगर मध्ये स्वर्गीय अनंतराव भालेराव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी पोलिसांच्या(police) भ्रष्टाचारावर परखड भाष्य केले. मी जेव्हा पोलीस दलात अधिकारी म्हणून प्रवेश केला तेव्हा हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पोलीस अधिकारी भ्रष्टाचारे होते, ते पैसे खात होते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पैसे खात नाहीत. असे त्यांनी सांगितले. म्हणजे पोलीस दल हे भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतले आहे असेच त्यांना म्हणावयाचे आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचाराला त्यांनी सामान्य माणसाला ही जबाबदार धरले आहे.

सामान्य माणूस हा पोलिसांना(police) घाबरतो. त्याचे नेमके उदाहरण द्यायचे झाले तर, सामान्य माणूस रस्त्यावर झालेल्या अपघाताची पोलिसांना मोबाईल वरून माहिती देत नाही. पोलीस नको ते लफडं आपल्या मागे लावतील अशी त्याला भीती असते. एखादा गुन्हा घडत असेल, तर सामान्य माणूस बघायची भूमिका घेतो. तो पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत नाही. अशा सामान्य माणसाला कारण परत्वे पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली तर तो मनातून प्रचंड घाबरलेला असतो. त्याचा फायदा किंवा गैरफायदा पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी घेत असतो.

तो समोरच्या माणसाकडे सरळ सरळ पैशाची मागणी करतो. साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करायचा म्हटला तरी पोलिसांना चिरीमिरी द्यावी लागते. हे आजचे वास्तव आहे. म्हणूनच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (ते नॉन करप्ट असतील तर) समोरच्या माणसाच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. पोलीस ही व्यवस्था सामान्य माणसाला घाबरवण्यासाठी नाही तर त्याच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आहे हे त्याला पटवून सांगितले पाहिजे. ज्या दिवशी सामान्य माणसाच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती दूर होईल त्या दिवशी पोलीस दलातील भ्रष्टाचाराचे प्रमाण एकदम खाली येईल.

शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग केला होता. त्या सरकारमध्ये भाई वैद्य हे गृहमंत्री होते. त्यांच्याकडे अवैध व्यवसायातील दोन मोठ्या व्यक्ती लाखो रुपयांची बंडले बॅगेत भरून त्यांच्या शासकीय बंगल्यात लाच देण्यासाठी आली होती. पण भाई वैद्य यांनी त्याची कल्पना आधीच अँटी करप्शन ब्युरो च्या अधिकाऱ्यांना दिली होती. या अधिकाऱ्यांनी सापळा रुचून लाच देण्यासाठी आलेल्या त्या दोन व्यक्तींना रंगेहात पकडले होते. अर्थात त्यावेळी पोलीस दलात भ्रष्टाचाराचे प्रमाणही लक्षणीय वाटावे इतके नव्हते.

आता श्रीमती मीरा बोरवणकर म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पैसे किंवा लाच न घेणारे पोलीस व पोलीस अधिकारी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. भ्रष्टाचाराचे हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढायला
अन्य घटकही जबाबदार आहेत.

कोल्हापूर जिल्हा किंवा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात असलेल्या पोलीस ठाण्यांना श्रेणी देण्यात आली आहे. अ ब क ड अशी श्रेणी देण्यात आली असून प्रथम श्रेणीचे पोलीस ठाणे मिळवण्यासाठी अधिकारी सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते वरिष्ठाकडून मागणी होईल इतके पैसे देण्यास तयार असतात. लाखो रुपये देऊन प्रथम श्रेणीचे पोलीस ठाणे संबंधित अधिकाऱ्याला मिळाले असेल तर तो गुंतवलेले पैसे आणि अतिरिक्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणारच. आणि हा प्रयत्न म्हणजे टेबलाखालून पैसे घेणे होय.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शहर वाहतूक नियंत्रण शाखा वगैरे शाखांमध्ये बदली होण्यासाठी पोलीस अधिकारी धडपडत असतात. अगदी मंत्री पातळीवर ते वशिला लावत असतात. पोलीस(police) दलातील वाढत्या भ्रष्टाचाराला जनता ही जबाबदार आहे हे श्रीमती मीरा बोरवणकर यांचे म्हणणे अर्धसत्य म्हणावे लागेल. इतर घटकही त्याला जबाबदार आहेत.
एक लाख लोकसंख्येमागे 220 पोलीस असले पाहिजेत. पण महाराष्ट्रात सध्या हे प्रमाण 160 इतके आहे. जिल्ह्याला मिळालेले पोलीस बळ हे कोणत्या कारणासाठी वापरले जाते किंवा गेले आहे याचे ऑडिट होणे गरजेचे आहे.

प्राधान्यक्रमात नसलेल्या गुन्ह्याविरोधी उपलब्ध पोलीस बळ हे कारवाई करत असते. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 40 लाख आहे असे गृहीत धरले तर जिल्ह्याला आठ हजारापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी असले पाहिजेत. प्रत्यक्ष वास्तव वेगळे आहे. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे, गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष करता येत नाही. पोलीस दलातील भ्रष्टाचाराला हे सुद्धा एक कारण आहे.

हेही वाचा :

“सनातन जागृतीचा हुंकार: ‘अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू’; रामगिरी महाराजांचे हिंदू मोर्चातून वक्तव्य”

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

‘मी राज कुंद्राला आजपर्यंत केवळ एकदाच…’; ED चौकशीनंतर अश्लील Video प्रकरणात अभिनेत्रीचा खुलासा