महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून (empower)लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होतीमहायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 देण्याची घोषणा करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडूनही महालक्ष्मी योजनेबाबत आश्वासन देण्यात आलं होतं. मविआ सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये देणार अशी घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र, निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी देण्यात आलेली आश्वासने सरकार पूर्ण करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच मंत्रीमंडळ विस्तार देखील होईल. यानंतर कॅबिनेट बैठकीत या योजनेबाबत निर्णय होऊ शकतो. अशात सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.महिलांना डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची (empower)तपासणी केली जाणार आहे. राज्यात 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतला आहे. मात्र आता सरकार फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यावर भर देणार आहे. योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासले जाणार आहे. यामुळे आर्थिक सहाय्य करताना पारदर्शकता येईल, असं सांगितलं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास सर्व 2 कोटी अर्जदार महिलांना या तपासणीत समाविष्ट केलं जाईल. या प्रक्रियेद्वारे, खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी केली जाईल.
अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहेलाभार्थ्यांची(empower) वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल.निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची तपासणी केली जाईल. यात त्रुटी आढळल्यास अर्ज बाद केले जातील.त्याचबरोबर पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच हा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरतानाच एक हमीपत्र लिहून दिले होते. आता त्याच हमीपत्रांची देखील पडताळणी सुरू झाली आहे.
हेही वाचा :
कोवीड लसीमुळे अचानक होतोय तरुणांचा मृत्यू?
भाजपने ‘EVM’मध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम; इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार
टी 20 सीरिजसाठी टीम जाहीर, 6 खेळाडूंचं कमबॅक, कॅप्टन कोण?