सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज हे नेहमीच व्हायरल होत(watch video) असतात. तुम्ही बऱ्याचदा आपल्या सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओज पाहिले असावेत. या व्हिडिओत कधी कोणते विचित्र स्टंट्स तर कधी काही थरारक घटना दर्शविल्या जातात. युजर्स असे व्हिडिओज फार मजा घेऊन पाहतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका धक्कादायक अपघातच प्रकार उघडकीस आला आहे. अपघातांचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील मात्र आजचा हा व्हायरल व्हिडिओ तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. काय आहे व्हिडिओत? चला जाणून घेऊयात.
ही घटना दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशात घडून आली आहे. येथील एका धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. या अपघातात चालू रस्त्यावर एक भीषण स्फोट झाल्याचे समजते, हा स्फोट इतका थरारक अनपेक्षित होता की त्याला पाहून आजूबाजूची सर्वच लोक हादरतात. विशेष म्हणजे, यात एक तरुणी (watch video)थेट जमिनीच्या आत खेचली जाते जे पाहून कोणच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत जर तुम्ही पाहिला तर त्यात तुम्हाला चालू रस्त्यावरचे काही दृश्य दिसतील. काही लोक शांतपणे पदपथावरून चालत होते. मात्र, एक महिला तिथून जात असतानाच अचानक भूमिगत इलेक्ट्रिक बॉक्समध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की, रस्त्यावर खोल खड्डा पडतो आणि यात ती जोरदार पडते आणि जमिनीच्या आत जाते. हा स्फोट इतका भीषण होता की, पदपथावरील एक सिमेंटचा स्लॅब देखील हवेत उडतो आणि महिलेच्या अंगावर जाऊन पडतो. (watch video)सुदैवाने तिथे लष्कराचा एक जवान घटनास्थळी गस्त घालत होता. तो लगेचच महिलेच्या मदतीसाठी धावत आला. या स्फोटमुळे महिला गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे.
What the hell is going on here?
— December 8, 2024
In Peru, the sidewalk literally exploded under a woman's feet! pic.twitter.com/lTTLysZxZ2
रस्त्यावरील या थरारक अपघाताचा व्हिडिओ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘इथे काय चालले आहे? पेरूमध्ये महिलेच्या पायाखालचा फुटपाथ अक्षरशः फुटला!’ असे लिहिण्यात आले आहे. घटनेचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
हेही वाचा :
कोवीड लसीमुळे अचानक होतोय तरुणांचा मृत्यू?
भाजपने ‘EVM’मध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम; इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार
टी 20 सीरिजसाठी टीम जाहीर, 6 खेळाडूंचं कमबॅक, कॅप्टन कोण?