चॅम्पियन्स ट्रॉफीच्या(Champions Trophy) आयोजनाबाबत प्रचंड गोंधळ सुरु आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तिसऱ्या देशात खेळण्याच्या सूचनेला सहमती दर्शवली होती.
परंतु 2027 पर्यंत भारतात होणाऱ्या कोणत्याही आयसीसी टूर्नामेंटसाठीही हेच मॉडेल असावे अशी मागणी पीसीबीने केली आहे. यासाठी भारत अजिबात तयार नाही. अशा परिस्थितीत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत(Champions Trophy) अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने आपल्या बोर्डाला अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा सल्ला दिला आहे. भारताने असे कोणतेही नाट्यमय पाऊल उचलण्यापूर्वी आपणही तेच केले पाहिजे, असेही ते म्हणाले. रशीद लतीफने पाकिस्तानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. लतीफ म्हणाले की, ‘भारताने असे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी पाकिस्तानने आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकला पाहिजे. आता चॅम्पियन्स ट्रॉफी होऊ नये.”
पुढे राशिद लतीफ म्हणाले की, “आता वेळ आली आहे की पाकिस्तानला खंबीरपणे उभे राहावे लागेल. दोन्ही देशांमधील राजकीय वाद असतानाही पाकिस्तान नेहमीच खेळत आला आहे. अफगाण युद्ध असो किंवा क्रिकेट, आम्हाला नेहमीच बळीचा बकरा बनवले जातो.” अलीकडेच झालेल्या आयसीसीच्या बैठकीत भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जाऊ शकतात यावर एकमत झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भविष्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसारखे मॉडेल हवे आहे, अशी मागणी केली आहे.
भविष्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसारखे मॉडेल हवे याबाबदल बोलताना राशिद लतीफ म्हणाले, ” 2027 पर्यंत भारतात होणाऱ्या सर्व आयसीसी टूर्नामेंटला पाकिस्तान जाणार नाहीत. त्यानंतर पाकिस्तानी टीमचे सामने इतर देशात आयोजित केले जावेत.” परंतु या मागणीसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड तयार नाही. भारताच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी आयसीसीसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!
80 हजार कमावतो, नो बॉस-नो मॅनेजर… बाइक ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट ऐकताच बसेल धक्का