विधानसभा निवडणुकीत भाजपने(political party) सर्वाधिक जागा मिळवून राज्यात सर्वात मोठा पक्ष असल्याचं सिद्ध केलं आहे. मात्र आता विधानसभेच्या यशानंतर भाजपने पुणे महानगरपालिकेकडे लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे भाजपने कंबर कसून तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिकेत पुन्हा सत्ता आणण्याची जोरदार तयारी भाजपाने सुरु केली आहे. तर महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत प्रशासक असल्याने पुणेकरांच्या नागरी प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेले आहे.
परंतु, आता भाजप(political party) पुण्याच्या महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागले आहे. पुणे शहरातील विधानसभेत भाजपाने 50,000 हजार भाजप सदस्यांच्या नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. तर पुणे शहरातील प्रत्येक प्रभागात 10,000 भाजपाचे सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात निरीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहेत.
यासंदर्भात पुणे शहर भाजप लवकरच प्रभाग निहाय बैठका देखील घेणार आहे. कारण यासंदर्भात भाजपाचे कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांनी प्रतिक्रीया दिली आहे. विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर भाजपाने महापालिका निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून कोणतीही तयार होताना दिसत नाही. कारण महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला एकत्र सामोरे जायचे की स्वबळावर महापालिका निवडणूक लढवायची यावर महाविकास आघाडीमध्ये अजूनही एकमत होताना दिसत नसल्याचं भाजपा आमदार हेमंत रासने यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
‘लाडकी बहीण’ योजनेच्या निकषात खरंच बदल केलाय का? आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती
85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचा शरद पवारांना खास मेसेज! म्हणाले, ‘आपणांस उत्तम…’
“आधीच बहिष्कार घाला…” चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा वातावरण तापले, रशीद लतीफचा PCB ला सल्ला