राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(current politics) यांनी आज 12 डिसेंबररोजी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थित आहेत.
या सर्वांनी आज दिल्लीत शरद पवारांच्या(current politics) निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आता या भेटीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
यावेळी भविष्यात काय घडेल काहीच सांगता येत नाही अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट पुढे म्हणाले की, अजितदादा हे शरद पवार यांना भेटल्याने शिवसेनेची कसलीही कोंडी होणार नाही. तसेच ही कौटुंबिक भेट असेल तर ठिक. पण जाणकार म्हणतात की, शरद पवार आणि अजित पवार पुढील काळात एकत्र येतील. त्यामुळे आता भविष्यात काय घडेल माहीत नाही. पण त्यांना शुभेच्छा असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी स्वतः देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली. आम्ही इन जनरल विषयांवर चर्चा केली. चहा, पाणी, नाश्ता केला आणि निघालो, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
तसेच परभणीला काय घडलं याबरोबर इतर महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो. इन जनरल चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, अधिवेशन केव्हा आहे, यावरही चर्चा केली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा :
नाश्त्यासाठी पदार्थ शोधताय? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवून पहा रव्याचा उत्तपम
आधीच दारू प्यायलेला, त्यात बस थांबवून पुन्हा दारू विकत घेतली; बेस्ट चालकाचा आणखी एक…
माझी आई रक्ताच्या थारोळ्यात अन् तो सोन्याच्या बांगड्या काढतोय, लाज नाही वाटली?