5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. यानंतर सर्वांचं लक्ष आता मंत्रीमंडळ विस्तराकडे लागलं आहे. उद्या 14 डिसेंबररोजी मंत्रीमंडळ(political news todays) विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अजूनही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. आता यात कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या खात्यावरून तिढा रंगला होता, त्या गृहखात्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थखातं आणि गृहखातं भाजप(political news todays) स्वत: कडे ठेवणार असल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. मात्र, भाजप अर्थखाते देखील आपल्याकडे ठेवणार असल्याचं बोललं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे 21 खाती, शिवसेना शिंदे गटाकडे 13, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रीपदं जाणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपकडून 17, तर शिवसेना 10, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असणार आहे. तर अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना शिंदे गट संभाव्य यादी-
उदय सामंत
तानाजी सावंत
शंभूराजे देसाई
दादा भुसे
गुलाबराव पाटील
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
भरत गोगावले
राष्ट्रवादी (अजित पवार गट) संभाव्य यादी-
आदिती तटकरे
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
धनंजय मुंडे
धर्मरावबाबा अत्राम
अनिल पाटील
दत्ता भरणे
हेही वाचा :
माझी आई रक्ताच्या थारोळ्यात अन् तो सोन्याच्या बांगड्या काढतोय, लाज नाही वाटली?
नाश्त्यासाठी पदार्थ शोधताय? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवून पहा रव्याचा उत्तपम
पवारसाहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?