काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?

सध्या राज्यात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. कारण उत्तरेकडून वायव्येच्या दिशेला येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील सर्वच भागात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. तसेच उत्तरी राज्यांच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणारी हिमवृष्टी आणि तापमान घट या सर्व बदलांचा परिणाम देशाच्या उर्वरित राज्यांच्या हवामानावर (weather) मोठ्या प्रमाणात होत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या या शीतलहरींमुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र प्रचंड प्रमाणात गारठला आहे. तसेच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात देखील काही प्रमाणात बदल होण्याचा इशारा हवामान(weather) खात्याने दिला आहे.

याशिवाय गेल्या 48 तासांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने देशातील दक्षिण किनारपट्टी व क्षेत्र प्रभावित होण्यासमवेत महाराष्ट्रावर देखील पावसाचं सावट आहे. त्यामुळे आता शनिवारपासून म्हणजे 14 डिसेंबरपासून गारठा काही प्रमाणात कमी होऊन राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील या बदलांमुळं तापमानवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून पून्हा राज्यात गुलाबी थंडी हजेरी लावताना दिसणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी देखील वाढत्या थंडीमुळं योग्य काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

तसेच कमी दाबाच्या पट्ट्यामुळं तामिळनाडूच्या किनारपट्टीवर देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे आता हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होणार आहे.

हेही वाचा :

सांगलीत हत्येचा थरार! धारधार शस्त्राने वार, पाच जण जखमी, एकाचा मृत्यू

12 वर्षाच्या मुलीच्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी कुवेतमधून बाप आला भारतात आणि…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी उरले फक्त 3 दिवस