गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (political updates)यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या पाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांसोबत(political updates) जाणे आणि भाजपासोबत जाणे हे एकच आहे. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. त्यांच्याबरोबर जवळपास मी रोजच असतो. राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा आजूबाजूलाच आहे.
पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील, असे मला वाटत नाही. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नौशे गौशे घाबरून पळून गेलेले आहेत. त्यांच्या नादाला लागून ते काही वेगळा विचार करतील असे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, गौतम अदानींच्या घरी आजकाल राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचे भविष्य ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ज्यांनी महाराष्ट्राचे विमानतळ ताब्यात घेतले. धारावीसह हजारो एकर मुंबईची जमीन गिळली. महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले. हे गौतम अदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. ते काय आचार्य विनोबा भावे आहेत का? गौतम अदानी म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एक उद्योगपती राजकरण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थी करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहे. जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे. मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून या देशात गोंधळ सुरू आहे. हा उद्योगपती महाराष्ट्रात राजकारण करणार, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसत आहेत. मराठी म्हणून स्वतःला म्हणवून घेतात त्यांना लाज वाटली पाहिजे , असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा :
न्याय व्यवस्थेची अप्रतिष्ठा?
एका सेकंदात कासवाने गिळला जिवंत खेकडा…Viral Video
भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी सामना रद्द होणार?