उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार; संजय राऊत काय म्हणाले?

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाविकास आघाडी(political campaign) पुरती खचली असल्याचे दिसत आहे. त्यातच आता राज्यात येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना(political campaign) महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर काँग्रेसने त्यावर सध्या तरी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

गेल्या दोन अडिच वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आतापर्यंत या निवडणुकात युती किंवा आघाडीमध्येही लढल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही कोणताही निणय घेताना, तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय़ घेत असतो.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या याच वक्तव्यावरून उद्धव ठाकरे वेगळा निर्णय़ घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू द्या, शिवसेनेने मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ते महाराष्ट्रात राहिले पाहिजे, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुका लढत राहू, असंही संजय राऊत यांनी नमुद केलं.

हेही वाचा :

टॅक्सीत विकृत वर्तनाचा व्हिडीओ व्हायरल: मुलीने दिला धाडसी प्रतिसाद?

मोठी बातमी : पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक

शरद पवारांचे 5 खासदार फोडा, तरच अजितदादांना केंद्रात मंत्रीपद?, खळबळजनक दावा समोर