एक चूक जीवावर बेतली! वर्गात चिमुकलीने गिळले पेनाचे टोपण अन् नको ते घडलं…

धुळ्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरडीने पेनाचे(pen) टोपण गिळल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, चिमुकलीच्या मृत्यूमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चना युवराज खैरनार असं या मुलीचे नाव असून ती सात वर्षांची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील जिल्हा परिषद शाळे निमखेडी येथे इयत्ता पहिलीत शिकणारी अर्चना युवराज खैरनार या तरुणीचे पेनाचे(pen)टोपण गिळले. मात्र, श्वासनलिकेत पेनाचे टोपण अडकल्याने तिचा श्वास कोंडला गेला. अर्चनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.

अर्चना तिच्या आजोबांकडे निमखेडी येथे शिकण्यासाठी आली होती. शाळा सुरु असतानाच तिने पेनाचे टोपण गिळले. ही बाबा शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वसननलिकेत टोपणे रुतून बसल्यामुळं ते काढता आले नाही. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज जिल्हा परिषदेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने वर्गात लिहिताना पेनाचे टोपण तोंडात टाकलं. पेनाचे टोपण श्वसननलिकेत अडकलं. ही बाबा लक्षात येताच श्वसननलिकेत अडकलेले टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. यानंतर तिच्या आजीला बोलवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तिच्या शिक्षकांनी दिली आहे.

हेही वाचा :

रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार!

‘…तर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता होऊ शकते’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा इशारा

अल्लू अर्जुनच्या अटकेतील मृत महिलेच्या पतीचा यू-टर्न, केस घेणार मागे