गाडीला धक्का देत होता तेवढ्यात ट्रॅक्टरखाली आला ड्रायव्हर, आधी चिरडला अन् मग… Video

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात काही अपघातांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ इतके थरारक असतात की त्यांना पाहून लोकांचा थरकाप होऊ लागतो. सध्या सोशल मीडियावर आणखीन एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रॅक्टर(tractor) चालकासोबत एक मोठा अपघात झाल्याचे दिसून येते. हा अपघात पाहून आता अनेकांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. व्हिडिओतील दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. या अपघातात नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

मुळातच गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करण्याचा आणि स्वतःच्या जीवाशी विशेष काळजी घेण्याचा सल्ला वारंवार केला जातो. मात्र बऱ्याचदा लोक या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि मग गंभीर अपघाताला बळी पडतात. आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रॅक्टर(tractor) चालक ट्रॅक्टरमधून खाली उतरून ट्रॅक्टर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ढकलत असताना अचानक गाडी चालू होते आणि चालक चक्क गाडीखाली येतो. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक होती, कारण ट्रॅक्टरचे जास्त वजन आणि त्याचे जाड चाक कोणत्याही व्यक्तीला गंभीरपणे जखमी करू शकते. ही घटना पाहून अनेकांचे डोळे उंचावले मात्र चिंतेची गरज नाही कारण यात त्याला जास्त काही झाले आणि त्याचा जीव बचावला. धक्कादायक बाब म्हणजे ट्रॅक्टर माणसाच्या अंगावरून गेला, मात्र तरीही तो पूर्णपणे सुरक्षित राहिला.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले तर दिसते की, ट्रॅक्टर ढकलताला अचानक ट्रॅक्टर व्यक्तीच्या अंगावरून जातो. मात्र काही सेकंदात ही व्यक्ती उठते आणि उभी राहते. हा संपूर्ण प्रकार पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत की शेवटी तो कसा वाचला. त्याचे नशीब आणि परिस्थिती दोन्ही आश्चर्यकारक होते.

व्हिडिओतील दृश्ये पाहून आता चालकाचा जीव जातोय का काय असे सर्वांना वाटू लागते मात्र घटनेच्या दुसऱ्याच क्षणी चालक उभा राहतो आणि ट्रॅक्टर पन्हाळ चालवायला सुरुवात करतो. हे दृश्य त्याच्या शारीरिक ताकदीचेच नव्हे तर त्याच्या मानसिक बळाचेही उदाहरण होते. त्या धोकादायक परिस्थितीनंतरही चालकाने हिंमत न गमावता आपले काम सुरू ठेवले. कधी कधी आपले नशीब इतके बलवान असते की आपण मोठ्या अपघातातूनही वाचतो, हे या व्हिडीओतून दिसून येते.

या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @enamul___hoqe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत, तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हसू नका, तिचे धैर्य आणि सामर्थ्य पहा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या शौर्याबरोबरच त्याच्या हिमतीलाही सलाम”.

हेही वाचा :

राजकारण तापणार; रेल्वेने नोटीस दिलेल्या हनुमान मंदिराल आदित्य ठाकरे भेट देणार

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली

खूप कामाची आहे Flipkart ची VIP मेंबरशिप! मिळतात अनेक फायदे