बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या झनक शुक्लाने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘कल हो ना हो’मध्ये जियाची भूमिका साकारली होती. तसेच, ती करिश्मा का करिश्मा टीव्ही शोसाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने तिच्या दीर्घकाळाच्या प्रियकराशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे(married) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
९० च्या दशकातील प्रसिद्ध बाल अभिनेत्री झनक शुक्लाने प्रियकराशी लग्न केल्यानंतर तिच्या जोडीदारासोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे. झनकची आई आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांनी झनकच्या लग्नात (married) रंगत आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही. एवढेच नाही तर अभिनेत्रीने तिच्या मुलीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
करिश्मा का करिश्मा टीव्ही शोमधून प्रसिद्ध झालेल्या झनकने तिच्या लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचे सौंदर्य वाखाणण्याजोगे होते. तर, अभिनेत्रीचा होणार नवरा स्वप्नील सूर्यवंशी याने पांढरी शेरवानी आणि लाल पगडी परिधान केली होती.
लग्नाच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सुप्रिया आपल्या जावईचे भव्य स्टाईलमध्ये स्वागत करताना दिसत आहे. झनक शुक्ला आणि स्वप्नील सूर्यवंशी यांचा विवाह पहारी रितीरिवाजानुसार पार पडला. तसेच स्वप्नील सूर्यवंशी व्यवसायाने इंजिनियर आहे. कल हो ना हो अभिनेत्रीच्या हळदी समारंभाशी संबंधित व्हिडिओ देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
झनक शुक्ला ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने शाहरुख खानच्या चित्रपटातही काम केले होते. मात्र, तिने अभिनय जगताला अलविदा केले आहे. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘मी अभिनय करणे मुद्दाम सोडले नाही, ते फक्त वेळेनुसार झाले. माझ्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली. नंतर माझ्या पालकांनी मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. शिकत असताना अभिनयातला रस कमी झाला.’ असे ती म्हणाली.
हेही वाचा :
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार नुकसान भरपाई
“सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! जाणून घ्या आजचे दर”
आदित्य ठाकरेंचा इशारा अन् दादरच्या हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटीसीला स्थगिती