लोकसभा (Political)निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला लोकसभेत मोठा फटका बसला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने 53 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी तब्बल 41 उमेदवारांचा विजय झाला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली.(Political) विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी बाजी मारली. अजित पवार आणि महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेमुळे फायदा झाल्याचे दिसून आले आहे. आता अजित पवारांनी लोकसभेनंतरची परिस्थिती आणि लाडकी बहीण योजनेचं गणित सांगितलं आहे.
बारामती शहरात बांधण्यात येणाऱ्या 100 रो हाऊसचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. ईव्हीएमवर बोलत आहेत. लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला तो त्यांनी मान्य केला. विधानसभा निवडणुकीत 396 पैकी मी फक्त चार बूथमध्ये मागे आहे.
बारामतीकरांसारखा मतदार देशात सापडणार नाही. येथे लोकसभेला मला 800 मते कमी होते, तर विधानसभेला दीड हजार मतं जास्त मिळालेत. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा एवढ्या जागा सरकारला मिळाल्या आहेत. बारामतीत मी इमारती बांधताना हवेत बांधू शकत नाही. त्याच्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना त्यांच्या जमिनी द्याव्या लागणार त्याचा मोबदला मी त्यांना देईल, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, मोदींना मी सांगत होतो आम्हाला सगळ्या समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन जायचं आहे. मोदींनी सांगितलं मी तुम्हाला मदत करत राहील. मी नास्तिक नाही. यावेळी माझ्या लाडल्या बहिणीने मला वाचवलं. लोकसभा झाल्यावर विचार करत होतो की, सरकार आलं पाहिजे. त्यातून ही योजना आणली. आमच्या मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण बहिणींनी योग्य बटणे दाबली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
नोकरीवरून कमी केल्याच्या रागातून तरूणाचा अधिकाऱ्यावर हल्ला
या मूलांकांच्या लोकांची कायदेशीर अडचणीतून सुटका होण्याची शक्यता
शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्…; 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार