सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडिओज(video) शेअर केले जातात. या व्हिडिओत अपघातांचा जीवघेणे थरार दिसून येतो. बऱ्याचदा असे हे व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. मात्र सध्या जो अपघातचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यातील थरारक दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवून टाकेल. या भीषण अपघाताची दृश्ये पाहून आता लोक आवाक् झाली आहेत.
पुन्हा एकदा सोशल मीडियावर अपघाताचा जीवघेणा थरार व्हायरल झाला आहे. मुळातच गाडी चालवताना सावधानता बाळगणे गरजेचे असते. चालू रस्त्यावर गाडीचा वेग कमी असणे, सिग्नल कडे लक्ष देणे आणि रस्त्यावर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं असत. आपली एक चूक आपल्या अन्यथा समोरच्याचा जीववर बेतू शकते.
सध्या असाच काहीसा प्रकार व्हायरल व्हिडिओत (video)घडून आल्याचे दिसून आले. यात एका भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीने रस्त्यावरील घोडागाडीला जोरदार धडक दिली. मुख्य म्हणजे ही धडक इतकी मोठी होती की यात गाडीचा चक्काचूर होऊन घोडा थेट हवेत झेप घेतो. हा सर्व प्रकार पाहून अनेकांचे डोळे उंचावले. चला नक्की काय घडलं व्हिडिओत ते जाणून घेऊयात.
ही घटना उत्तर प्रदेशमधील बागपत या ठिकाणी घडली आहे. तर झाले असे की, एक घोडागाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. या गाडीचा मालक दुकानात काही तरी खरेदी करत होता. त्याने आपल्या घोड्याला मोकळं करून गाडीशेजारी उभं केलं होतं. यानंतर हा घोडा हळूहळू पुढे जात रस्त्यावर जाऊन उभा राहिला. तितक्यात समोरून एक भरधाव गाडी आली आणि घोड्याला थेट हवेत उडवून गेली. यात तुम्ही पाहू शकता की, ही धडक इतकी मोठी होती की यात घोडा अक्षरशः हवेत तरंगून जोरात जमिनीवर आपटला जातो. व्हिडिओतील दृश्ये पाहून त्याला दुखापत झाल्याचे समजून येते.
ही संपूर्ण घटना जवळच्या CCTV कॅमेरात कैद झाली असून याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. घटनेचा व्हायरल व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कारच्या धडकेमुळे घोडा 7 फूट हवेत उडी मारून 20 फूट दूर पडला. घोडा मेला. कार आणि घोडा-बग्गीमधून प्रवास करणारे पाच जण जखमी झाले’ असे सांगण्यात आले आहे.
व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “जबाबदारी कोणत्याही ड्रायव्हरची आहे. वेग सांभाळणे महत्त्वाचे आहे. गावात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग असावेत.. अतिवेगवान वाहतूक टाळण्यासाठी.. गावाजवळ सेवा रस्ते उपलब्ध करून देण्याचा विचार शासनाने करावा. सेवा रस्ते, अंडरपास किंवा पूल अपघात टाळतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एवढ्या वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?”.
हेही वाचा :
ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून…
देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी