हिंदू धर्मात पौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. मार्गशीर्ष (Purnima)पौर्णिमा ही 2024 वर्षाची शेवटची पौर्णिमा आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान, गरजूंना दान, पूजा, उपवास, सत्यनारायण पूजा इत्यादींना विशेष धार्मिक महत्त्व आहे.
मार्गशीर्ष (Purnima)पौर्णिमेलाच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि या दिवशी देवी अन्नपूर्णेची पूजा केली जाते. त्यामुळेच धार्मिक दृष्टिकोनातून मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व अधिक आहे. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा रविवार, 15 डिसेंबर 2024 रोजी आहे. या शुभ दिवशी तुम्ही काही खास नियमांचं पालन केलं पाहिजे. मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही हे नियम मोडले तर तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत नाही. त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
मार्गशीर्ष पौर्णिमेला या गोष्टी करणं टाळा
-मार्गशीर्ष पौर्णिमेला लोकांनी केस किंवा दाढी करू नये. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. याशिवाय कुंडलीत चंद्राची स्थितीही कमकुवत होते.
-पौर्णिमेच्या शुभ दिवशी लोकांनी काळे कपडे घालू नयेत. ज्योतिषी अनिश व्यास यांच्या मते काळा रंग नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शुभ दिवशी ते घालणे चांगले नाही. या दिवशी तुम्ही लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा असे शुभ रंगाचे कपडे परिधान करू शकता.
-पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत. यामुळे भगवान विष्णू क्रोधित होतात. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा रविवारी आहे. शास्त्रात पौर्णिमा, एकादशी आणि रविवारी तुळस तोडणे निषिद्ध मानले गेले आहे.
-पौर्णिमा तिथीचा संबंध चंद्राशी आहे. त्यामुळे आज रात्री चंद्र उगवल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन पूजा करण्यास विसरू नका. तसेच चुकूनही चंद्राचा अपमान करू नका. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या वाढतात.
-मार्गशीर्ष पौर्णिमेला व्रत करण्याची परंपरा आहे. पण तरीही काही कारणास्तव उपवास ठेवला नाही तर आज मांसाहार टाळा.
मार्गशीर्ष पौर्णिमेला करा हे उपाय
-मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी घराच्या ईशान्य दिशेला दिवा लावा. यामुळे धनलक्ष्मी आकर्षित होते.
-जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर देवाला चंदनाचा टिळा लावा. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला लाल रंगाची ओढणी चढवा.
-मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी सकाळी स्नान करुन सर्वात आधी पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करा.
-त्यानंतर देवी लक्ष्मीचं ध्यान करुन पिंपळाच्या झाडावर तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मीचं ध्यान करावं. मान्यतेनुसार, या दिवशी उपाय केल्याने जीवनात सुख, शांती आणि सौभाग्य टिकून राहते.
-या दिवशी दूध, दही, तूप, साखर आणि तांदळाचं दान करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल.
हेही वाचा :
भररस्त्यात चारचाकीची घोडागाडीला धडक, अन् घोडा थेट… मृत्यूचा थरारक Video Viral
देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
मुलांना नाही आवडत मुलींच्या ‘या’ 5 सवयी, बनतात ब्रेकअपचं कारण