‘हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,’ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला… Video Viral

गाब्बा येथील तिसऱ्या कसोटीच्या(cricket) दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी भक्कम खेळी करत संघाला मोठी मजल मारण्यात मदत केली आहे. ऑस्ट्रेलिया फलंदाजांपुढे भारतीय खेळाडू हतबल झाल्याचं दित होतं.. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माची विचार करण्याची क्षमताही संपल्यासारखी वाटत होती.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, रवींद्र जडेजा किंवा नितीश रेड्डी असो, कोणत्याही वेगवान गोलंदाजाकडे हेड आणि स्मिथ भागीदारी तोडण्याची रणनीती दिसत नाही. दरम्यान सिराजच्या एका ओव्हरदरम्यान कर्णधार रोहितने मैदानावर लावलेल्या क्षेत्ररक्षणाला(cricket) ऑस्ट्रेलियाच्या महान सायमन कॅटिचने ‘मूर्ख’ म्हटलं.

दुसऱ्या दिवशी समालोचन करताना कॅटिचने आक्षेपार्ह टिप्पणी केली. सिराजने थर्ड-मॅन क्षेत्ररक्षकाला काढलेलं असताना थेट हेडला बाउन्सर टाकल्याचं पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज स्तब्ध झाला. हेडने या चेंडूवर संधी साधत हेडनेही चेंडू सीमेपार पोहोचवला.

“मोहम्मद सिराजकडून हे अविश्वसनीय आहे कारण त्याच्या आधीच्या षटकात एक फिल्डर त्या जागेवर होता. त्याने तेथे क्षेत्ररक्षकाशिवाय जे प्लॅनिंग केलं त्यामुळे आणखी धावा गेल्या आहेत, हा मूर्खपमा आहे, हे मूर्ख क्रिकेट आहे”.

“त्यांच्याकडे लेगसाइडवर दोन खेळाडू आहे. एक खेळाडू डीप पाईंटला आहे. आणि ट्रॅव्हिस हेडच्या या प्लॅनसाठी त्या जागी एक माणूस आहे आणि नंतर त्याच्याकडे क्षेत्ररक्षक नाही. आता तो क्षेत्ररक्षकाला तिथे उभं करणार आहे आहे. आता काम संपलं आहे मित्रा,” असं तो म्हणाला. खेळाच्या त्या टप्प्यात रोहित आणि सिराजच्या रणनितीवर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

रोहितचे गोलंदाजांचे रोटेशन, वेगवेगळ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांविरुद्धच्या मॅचअपवरही खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. तिसऱ्या कसोटीसाठी रविंद्रन अश्विनला संघातून काढून टाकून रवींद्र जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर करताना भारतीय कर्णधाराला टीकेचा सामना करावा लागला.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून तब्बल 405 धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट्स घेण्यात यश आले.

हेही वाचा :

आज मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी;

मुलांना नाही आवडत मुलींच्या ‘या’ 5 सवयी, बनतात ब्रेकअपचं कारण

मोबाईल फोन जप्त केल्याने विद्यार्थ्याने थेट शिक्षकांवर केला चाकूने हल्ला, Video Viral