जंगलाच्या राजाची छेड काढणं तरुणांना पडलं महागात; सिंहाने हल्ला केला अन्… Video

सोशल मीडियावर(social media) दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स , भांडण यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय वन्य प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तुम्हाला माहितच असेल की, हे वन्य प्राणी किती खतरनाक असतात. ते कधी कोणावर हल्ला करतील सांगता येत नाही.

जंगालाचा राजा सिंह तर किती खतरनाक आहे हे तुम्हाला माहितच असेल. पण तरीही लोक त्याला त्रास द्यायला जातात. आपली हिरोगीरी दाखवण्यासाठी लोक असे धोकादायक स्टंट करताता आणि मग असे काहीतरी घडते की ज्याचा कधी विचार देखील केला नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका पाळीव सिंहाने दोन तरुणांवर हल्ला केला आहे. खरंतर सिंह कुठेही असो तो शिकार करणे सोडत नाही याचेच हा व्हिडिओ उदाहरण आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण बिनधास्तपणे सिंहाच्या पिंजऱ्यात शिरले आहे. ते दोघे सिंहासोबत खेळत असतात. मात्र, सिंहाला अचानक राग येतो आणि तो एका तरुणावर हल्ला करतो. तो त्या तरुणाचा पाय धरुन बसतो. दोन्ही तरुण खूप घाबरताता.

मग दुसरा तरुण सिंहाला तेथील एका काठीने मारयला सुरुवात करतो. दोघेही सिंहाच्या तावडीतून पाय सोडवण्याचा प्रयत्म करत असतात. पण सिंह मात्र अजिबात पाय सोडत नाही. सिंह तरुणाचा पाय जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करत असतो. सुदैवाने त्या तरुणाला काही होत नाही. मात्र त्यानंतर या तरुणांसोबत काय घडले याबाबत अद्या कोणतीही माहिती नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mian_azhar_lionking या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेतय एका युजरने म्हटले आहे, सिंह कुठेही असो तो शिकार करणे कधीही सोडत नाही. आणखी एका युजरने मजेशीरपणे म्हटले आहे की, भाऊ, त्याच्या रात्रीच्या जेवणाची सोय करत आहे. तर अनेकांनी त्या तरुणांनीच त्याला त्रास दिला असणार असे म्हटले आहे. या व्हिडिओवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, प्राणी कोणताही असो त्याला त्रास न देणे ते कधी हल्ला करतील याचा नेम नाही असेही एका युजरने म्हटले आहे.

हेही वाचा :

प्रकाश अबिटकर मंत्री झाले त्याची काही खास कारणे…!

महायुतीत नाराजीनाट्याला सुरूवात; शिंदे-फडणवीस-पवारांचे टेन्शन वाढणार?

तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो ‘हा’ आजार