इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक आहे. चेन्नई सुपरकिंग्स(Chennai Super Kings) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएलची चॅम्पियनशिप जिंकली आहे. मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला खेळाडू नुकताच बाबा झाला. त्यानिमित्ताने सीएसकेने एक खास पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
चेन्नई सुपरकिंग्सचा(Chennai Super Kings) स्टार खेळाडू आणि न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉन्वे हा नुकताच बाबा झाला आहे. डेवोन कॉन्वेची पत्नी किम वॉटसन हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. डेवोन कॉन्वेची पत्नी किम वॉटसन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यांनी गोंडस मुळीच नावं ‘ऑलिविया’ असं ठेवलं आहे.
2022 मध्ये डेवोन कॉन्वे याने त्याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड किम वॉटसनशी लग्न केले. आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी सीएसकेने डेवोन कॉन्वेला रिलीज केलं होतं. मात्र ऑक्शनमध्ये संधी मिळाल्यावर त्यांनी कॉन्वेवर तब्बल 6.25 कोटी खर्च करून त्याला पुन्हा आपल्या संघात सामील केले.
चेन्नई सुपरकिंग्सने डेवोन कॉन्वे आणि पत्नी किम वॉटसन यांना आईवडील झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. चेन्नईने लिहिताना म्हटले की, डेव्हनचा डॅडीज आर्मीमध्ये अधिकृत प्रवेश झाला, त्यांच्या बाळाचं या जगात स्वागत आहे. किम आणि डेव्हॉनला या खास प्रवासासाठी शुभेच्छा.
चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2025 साठी ऑक्शनपूर्वी 5 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे ऑक्शनसाठी त्यांच्याकडे 1 RTM कार्ड आणि जवळपास 55 कोटी रुपये शिल्लक होते. ऑक्शनपूर्वी ऋतुराज गायकवाड (18 कोटी) , शिवम दुबे (12 कोटी) , रवींद्र जडेजा (18 कोटी), मथीशा पथिराना (13 कोटी) आणि एम एस धोनीला (4 कोटी) रिटेन केले.
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने फिरकी गोलंदाजांसाठी सर्वाधिक रक्कम खर्च केली. यात नूर अहमदसाठी 10 कोटी तर रविचंद्रन अश्विनसाठी 9.75 कोटी खर्च केले. तर सीएसकेने मिडल ऑर्डर आणि ऑलराउंड खेळाडूंना देखील ऑक्शनमधून निवडले. यात राहुल त्रिपाठीसाठी 3.40 कोटी, सॅम करन करता 2.40 कोटी रुपये खर्च केले. तर रचिन रवींद्रसाठी RTM कार्ड वापरून 4 कोटी मोजून त्याला संघात घेतले. सीएसकेने डेवोन कॉन्वेसाठी 6.25 कोटी रुपये खर्च केले.
हेही वाचा :
“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला
सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी
‘लाडकी बहीण’चा अर्ज झाला मंजूर, एकही हप्ता नाही ; निकषांच्या अंमलबजावणीची चर्चा