नागपूर: विधानसभा(assembly) निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान आजपासून नागपूरमध्ये सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याआधी काल राजभवनात महायुतीच्या 39 आमदारांचा शपथविधी पार पडला. दरम्यान महायुतीचे सरकार स्थापन झालयानंतर गेल्या काही दिवसांत राज्यात हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. बीड आणि परभणी जिल्ह्यांत काही अशा घटना घडल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केले आहे.
बीडमध्ये मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. तर परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. त्यानंतर परभणीत मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळेस जाळपोळ आणि दगडफेक देखील करण्यात आली होती. या दोन्ही घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(assembly) यांनी विधानभवनात भाष्य केले आहे.
बीड आणि परभणीत घडलेल्या घटना अतिशय गंभीर आहेत. दोन्ही घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या आहेत. अटकेची कारवाई झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांना देखील लवकर अटक करण्यात येईल. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बीड, परभणी येथील दोन्ही घटना गंभीर आहेत. यावर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. अपमान करणाऱ्याना सोडले जाणार नाही. ” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार राजभवनावर थाटामाटात पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पण मंत्र्यांच्या शपथविधीनंतर अनेक आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. आमदारांच्या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर खुलासे केले. महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आम्ही अडीच वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवला असल्याचा खुलासा केला.
मंत्री आपल्या विभागात योग्य पद्धतीने काम करत नाही,असे ऑडिटमध्ये लक्षात आले तर त्यावेळी त्या मंत्र्याचा पुनर्विचार केला जाईल. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांना पक्षाकडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील.
संविधानाचा अपमान कधीच सहन करणार नाही,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
बीड-परभणीसारख्या गंभीर घटनांचे राजकारण करणे अयोग्य…
(विधानसभा, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/qfqEa00fyN
भाजपमध्ये ज्यांना मंत्रिपद दिले जात नाही. त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात. पण जे मंत्री ड्रॉप झाले आहेत त्यातील काही लोक परफॉर्मन्स नसल्यामुळेच ड्रॉप झालेले असतात, असंही फडणीसांनी स्पष्ट केलं. 16 डिसेंबरपासून विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात होत आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आगामी विधानसभेच्या अधिवेशनात 20 विधेयके मांडण्यात येणार असून, ही विधेयके राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.
हेही वाचा :
छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? भुजबळांचं सूचक विधान होतंय तुफान व्हायरल
चेन्नई सुपरकिंग्सच्या डॅडीज आर्मीमध्ये अजून एकाची एंट्री, धोनीचा आवडता खेळाडू झाला बाबा
“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला