तौबा-तौबा… पंजाबी गायकाच्या कॉन्सर्टमध्ये मारामारी.. Video

लोकप्रिय गायक करण औजलाच्या मैफली सध्या चर्चेत आहेत. दिलजीत दोसांझनंतर जर कोणाबद्दल बोललं जात असेल तर ते करण औजला. काही लोक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचे(concert) वेडे आहेत, तर काहीजण करण औजला लाइव्ह परफॉर्म करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या गायक करण औजला दिल्लीत कार्यक्रम करत आहे. 15, 17 आणि 19 डिसेंबर रोजी दिल्लीत त्यांचे कॉन्सर्ट आहेत. आता काल रात्रीच्या कॉन्सर्टचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.

करण औजला 15 डिसेंबरला गुरुग्राममध्ये परफॉर्म करत होता. या काळात बरीच मारामारी झाली. आता शोदरम्यान झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, शो दरम्यान हा सर्व प्रकार पाहून लोक सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या कॉन्सर्टमध्ये(concert) सेलिब्रिटीही सहभागी होत आहेत. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक भांडत आहेत आणि त्यांच्याभोवती मुली आणि मुलेही उभी आहेत. एवढ्या मोठ्या मैफिलीत लोक उघडपणे गुंडगिरी करताना दिसले आहेत. ज्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले आहे.

गायक करण औजलाच्या दिल्ली कॉन्सर्टमध्ये लोकांमध्ये मारामारी झाल्याचे समोर आले अजून, तेथील व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही पुरुष एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक माणूस रागाने एका माणसाला मारतो आणि तो जमिनीवर पडतो.

जमिनीवरून उठताच त्याला पुन्हा धक्का बसतो आणि तो पुन्हा पडतो. यानंतर हे प्रकरण थांबवण्यासाठी मधेच बरेच लोक येतात, पण ती व्यक्ती खूप चिडलेली दिसते. यावेळी सिक्योरिटी मधील कोणताही माणूस इथे उपस्थित नव्हता. करण औजलाच्या दिल्ली कॉन्सर्टच्या प्लॅटिनम लाउंजमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, नंतर काय झाले? या व्यक्तीवर काही कारवाई झाली की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रविवारी झालेल्या या दिल्ली कॉन्सर्टमध्ये बादशाह आणि वरुण धवनसारखे स्टार्सही सहभागी झाले होते. दरम्यान, बॅरिकेडेड भागात काही लोक धक्काबुक्की आणि मारामारी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनाही धक्का बसला असून त्यांना सुरक्षेची चिंता होत आहे.

हेही वाचा :

5 रुपयांच्या नाण्यासंदर्भात मोठा निर्णय….

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा

अदानी-अंबानींना मोठा झटका! ब्लूमबर्गच्या 100 बिलियन डॉलर क्लबमधून बाहेर