राज्यामध्ये जोरदार राजकीय वातावरण(political news) तापले आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे. त्यातच महायुतीने 39 आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली आहे. मात्र त्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी दिली नाही. त्यामुळे भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधून त्यांनी महायुतीच्या नेत्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान आज भुजबळ यांनी येवला येथे पधाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ज्यांनी आपले काम केले नाही, त्यांचे देखील आपण काम करायचे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. कोणावर राग ठेवयाचा नाही. संकटाच्या काळात विरोधकांना मदत करायची आहे. कोणाबद्दल दुजाभाव बाळगायचा नाही. काही लोकांनी अजित पवारांना मला मंत्री न केल्याबद्दल धन्यवाद दिले. मला अनेक मंत्रीपदे मिळाली. आता नाही मिळाले त्याचा काही वाद नाही.
पुढे बोलताना छगन भुजबळ(political news) म्हणाले, “मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो. विरोधी पक्षनेता झालो तेव्हा पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. 1999 च्या काळात जर का कॉँग्रेस एक असती तर, मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधी यांच्यापासून अनेकांचे फोन येत होते की तुम्ही कॉँग्रेस सोडू नका. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी शरद पवार यांच्यासोबत गेलो.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे. सगळ्यांनी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. ‘मी मंत्रीमंडळात असावं,’ असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता, पण तरीही मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
मंत्रिपद कुणी नाकारलं, हे शोधावं लागेल, असे सांगत भुजबळांचा रोख कुणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न विचारण्यात येत आहे. तीनही गटांचे नेते निर्णय घेत असतात. आमच्या गटाचे नेते अजित पवार त्यांचा निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पण माझी अवहेलना केली गेली त्याचं दुःख आहे.
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलले नसल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांना विरोध केल्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आल्याचा दावा ओबीसी (इतर मागासवर्गीय) नेते भुजबळ यांनी केला. ‘जेव्हा मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करत होते, तेव्हा मी इतर मागासवर्गीय समाजाच्या बाजूने आवाज उठवला होता. लाडकी बहीण योजना आणि ओबीसींनी महायुतीला निवडणुकीत विजय मिळवून दिला.
हेही वाचा :
पुष्पा चित्रपटचा लहान मुलांवरती परिणाम ! बघा पोराने काय केलं…Video Viral
“गौतम गंभीरचा उत्साही नाच, आकाशदीपच्या चौकारावर हेड कोच खुश” Video
आनंदवार्ता… सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा, घाऊक महागाई नीचांकी पातळीवर