हवेत उडणाऱ्या ड्रोनला मगरीने टाकले गिळून, पुढे जे झाले…Video 

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज(video) व्हायरल होत असतात. यात काही अपघातांचे व्हिडिओ, कधी काही जीवघेण्या स्टंट्सचे व्हिडिओ तर कधी काही हास्यास्पद घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओज फार मोठ्या प्रमाणात युजर्सद्वारे पाहिले जातात, ज्यामुळे फार कमी वेळेत ते व्हायरल होतात.

इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित काही व्हिडिओ(video) देखील शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात मगरीची एक धक्कादायक शिकारीचे दृश्य दिसून येत आहे.

तुम्ही आजवर मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असावेत. मगर हा मुळातच एक धोकादायक प्राणी आहे, तो आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखला जातो.

मात्र यावेळी मगरीने ज्या गोष्टीची शिकार केली आहे, ती पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मगर चक्क हवेत उडणाऱ्या ड्रोनला गिळताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत आणि नैसर्गिक अधिवासांमध्ये ड्रोनच्या वापराबाबत चिंता निर्माण झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले तर दिसते की, एका तलावात एक मगर मुक्तपणे पोहत आहेत तितक्यात तिथे एक ड्रोन येतो आणि हवेत उडू लागतो. ड्रोनला पाहताच मगर त्यावर निशाणा साधते, काय ठाऊक आकाशात उडणारी ही गोष्ट तिला एकदा पक्षी वाटला असावा.

पुढे आपण पाहतो की, हा ड्रोन मगरीच्या जवळ येताच मगर हवेच्या वेगाने एक जोरदार उंच उडी मारते आणि या ड्रोनला आपल्या तोंडात घेते आणि पाण्यात विलीन होते. हे दृश्य पाहून आता अनेकजण आता हैराण झाले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ @anandmahindra नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये , ‘नैसर्गिक जग तंत्रज्ञानावर नेहमीच विजय मिळवेल याचा पुरावा’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 1.8 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तेजस्वी, तंत्रज्ञानाला निसर्गाचा पर्याय नाही, “मगरीला आता डेंटिस्टची गरज आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सुपर, एक मगर पक्षी पकडणारा बनला.. जरी त्याला त्याची चव आवडणार नसेल”.

हेही वाचा :

महायुतीने घेतला ‘या’ मोठ्या पदाचा निर्णय!

‘शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही…’; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला

आर अश्विनचा मोठा निर्णय; क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित