महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. अशातच आता महाराष्ट्रात काँग्रेस (Congress)पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर आता राज्यातील काँग्रेस पक्षसंघटनेत खांदेपालट होण्याची चिन्हे दिसायला सुरवात झाली आहे.
काँग्रेस(Congress) नेते नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून त्यांना आता विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना देखील काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून नेमले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी राज्यातून 5 नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये यशोमती ठाकुर,विश्वजीत कदम, सुनील केदार,विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या सभापतीपसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र आज भाजपकडून आहिल्यानगर जिल्ह्यातील आणि कर्जत तालुक्यातील नेते राम शिंदे यांना विधानपरिषदेच्या सभापतीसाठी रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती.
तसेच आता विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी फॉर्म भरायचा की नाही? यासंदर्भात काँग्रेस नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीला अभिजित वंजारी, अमित देशमुख, बंटी पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीत आता नेमक काय निर्णय होणार, याकडे सत्ताधाऱ्यांसह सगळ्यांच्याचं नजरा लागल्या आहेत.
मात्र आता काँग्रेस नेते नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास राजी झाले असले तरी ते आता विधिमंडळातील गटनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही देखील आहेत. मात्र, आता याला काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून विरोध होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
काळजी घ्या! थंडी आणखी वाढणार?, ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट
भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा मोठा निर्णय घेणार?
मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली PM मोदींची भेट