महाराष्ट्र हादरलं! नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, पालक संतप्त

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारजे माळवाडी भागातील एका नामांकित शाळेतील ३९ वर्षीय नृत्य प्रशिक्षकाने दोन चिमुकल्या विद्यार्थिंनीशी(students) अश्लील कृत्य करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारून कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. नृत्य प्रशिक्षक ३९ वर्षांचा असून, तो दिघी परिसरात राहण्यास आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पिडीत मुलगी चौथीच्या व दुसरी सहावीच्या वर्गात शिकते. शाळेत बॅड टच व गुड टच संदंर्भात एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत मुलींनी(students) त्यांच्यासोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. नंतर शाळेने व इतरांनी या मुलींना विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर नृत्य प्रशिक्षक अश्लील कृत्य करत असल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी प्रकरण गांर्भियाने घेतले.

तसेच, तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक देखील केली. पालकांनी हा प्रकार समोर आल्यानंतर शाळेच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, शाळेने खुलासा करत संबंधित शिक्षकावर शाळेकडून कठोर कारवाई केली असून, त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले.

हेही वाचा :

काळजी घ्या! थंडी आणखी वाढणार?, ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ 5 दिग्गज नेते शर्यतीत! कोणाची वर्णी लागणार?

अपघात झाला, दोष बायकोचा; नवऱ्याची विचित्र प्रतिक्रिया पाहून संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल