यमराज सुट्टीवर होता वाटतं? जोरादार वेगात आला, स्कॉर्पिओला धडकला अन्… Video Viral

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी थरकाप उडवणार व्हिडिओ(video) व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट , जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय अपघातांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कुठे कसा कोणाचा अपघात होईल सांगता येत नाही. यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवणे आणि सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ(video) व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर तुमचाही थरकाप उडेल पण जे घडले ते पाहून चमत्कार घडला कसा असा प्रश्न मनात येईल. यामध्ये एक बाईस्वारचा भरधाव वेगता असल्याने स्कार्पिओला धडकून अपघात झाला आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन अनेक वाहने वेगाने जात आहेत. दरम्यान एक स्कॉर्पिओ कार रस्त्याच्या मधे येऊन थांबते. त्यांला त्या ठिकाणी वळण घेयाचे असते यामुळे तो समोरुन येणारी कार जाण्याची वाट बघत असतो. याच दरम्यान एका बाजून एक तरुण भरधाव वेगात जात असतो.

अचानक स्कॉर्पिओ वळत असताना बाईकस्वाराची त्याला धडक होते. या धडकीमुळे बाईकस्वार हवेत उडतो आणि जोरात कारवर आदळतो. सुदैवाने बाईकस्वाराला कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. तो सुखरुप राहतो. मात्र, ही घटना चमत्कारपेक्षा कमी नाही.

हा व्हिडिओ पाहून लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, गाडी चालवताना सावधगिरी बाळगणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पाल करणे गरजेचे आहे. अनेकदा आपली चुकी नसतानाही आपण अपघाताला बळी पडू शकतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रीया देत एका युजरने म्हटले आहे की, नक्कीच त्याचे यमराज सोबत उठणे-बसणे असणार, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, भाऊ, काय नशीब आहे त्याचे.

हेही वाचा :

आधी आई, आता लेक… ‘पुष्पा २’च्या चेंगराचेंगरीत जखमी मुलगा ब्रेन डेड

महाराष्ट्र हादरलं! नृत्य प्रशिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार, पालक संतप्त

बाईकवरुन पडल्याचा दोष बायकोला? नवऱ्याच्या विचित्र प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल