राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(political news) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, नागपुरात सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ नाशिकला गेले. त्यांनी पुढील अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचं देखील जाहीर केलं.
छगन भुजबळांच्या(political news) या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही. मात्र, तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भुजबळ हे सध्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. ते लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. छगन भुजबळ हे आजघडीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेता आहेत. त्यांच्यासारखा मोठा चेहरा गमावणे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला परवडण्यासारखे नाही. विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी छगन भुजबळांच्या जाण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसू शकतो अशीही एक चर्चा आहे.
माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यामुळे मंत्रिपदी मला कोणी डावलले याची मी माहिती घेत आहे. असं विधान छगन भुजबळ यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केलं. आपल्यासारख्या बहुजन नेत्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नव्हता, असं भुजबळ म्हणालेत. एकप्रकारे गच्छेतीसाठी अजित पवार यांना जबाबदार धरल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ यांना मंत्री करावे, असे पक्षातील अन्य काही नेत्यांचे म्हणणे होते, अशीही माहिती समोर आली.
हेही वाचा :
जेव्हा गौरीचा भाऊ शाहरुख खानवर करायचा ‘दादागिरी’; धमकी देत म्हणालेला…
“पर्मनंट उपमुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री व्हा” – फडणवीसांची अजित पवारांना शुभेच्छा
खुशखबर! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार डिसेंबरचा हप्ता; मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख