या आठवड्यात मौल्यवान धातू सोने(Gold)-चांदीमध्ये चढ-उताराचे सत्र दिसून आले. आठवड्याच्या शेवटी दोन्ही धातूमध्ये स्वस्ताई दिसून आली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदी 4 हजारांनी तर सोने 1600 रुपयांनी उतरले. तर, या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याला मोठी आघाडी घेता आली नाही.
या सोमवारी सोन्यात(Gold) 1600 रुपयांची घसरण झाली.तर, मंगळवारी 17 डिसेंबररोजी त्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. तर, बुधवारी 18 तारखेला पुन्हा किमती 160 रुपयांनी खाली उतरल्या. काल 19 डिसेंबररोजी देखील सोन्यात 710 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात देखील घसरणीचे संकेत मिळत आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीने देखील आज आनंदवार्ता दिली. गेल्या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली. तर, या आठवड्यात तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 76,013, 23 कॅरेट 75,709, 22 कॅरेट सोने 69,628 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,010 रुपये, 14 कॅरेट सोने 44,468 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
भुजबळांचं आता ओबीसी कार्ड!…म्हणजेच “जल बिन मछली”
आता SSC बोर्ड तयार करणार मोबाईल ॲप; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा
शरद पवार गटातील ‘हा’ बडा आमदार अजितदादांच्या भेटीला, चर्चेला उधाण