सध्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधानसभेच्या(politics) हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजत आहेत. त्यामुळे राज्याचं राजकारण देखील चांगलंच तापताना दिसत आहे. अशातच मुंबईमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, खासदार संजय राऊत (politics)यांचा भांडुप येथे मैत्री नावाचा एक बंगला आहे. मात्र या मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञात इसमांकडून रेकी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याची घटना कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे.
मात्र या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, राऊत यांच्या घराबाहेर आलेल्या दोन अज्ञात तरुणांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते. तसेच वाहनचालकाच्या हातात देखील मोबाईल होता. मात्र मागे बसलेल्या अज्ञात व्यक्तीकडे चौरशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल दिसत आहेत. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, घटनास्थळी झोन सात मधील पोलीस विभागाची विविध पथके दाखल झाली आहेत. तसेच सीसीटीव्ही आणि आजूबाजूला देखील याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे.
तसेच जी बाईक होती ती यूपी, बिहारची असल्याचं सुनील राऊत म्हणाले आहेत. कारण राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सुनील राऊत यांनी म्हंटल आहे.
हेही वाचा :
रेकॉर्डब्रेक ‘पुष्पा 2’ ला उत्तर भारतीय सिनेमागृहातून हटवले?
2024 ते 2024 राहुल गांधींवर तब्बल इतके गुन्हे दाखल; 2019 मध्ये सर्वाधिक खटले
काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक; आमदारांची जोरदार घोषणाबाजी