रिलेशनशिपच्या बाबतीत आजच्या तरुणाईचा दृष्टिकोन अधिक मोकळा आणि वैविध्यपूर्ण झाला आहे. एकीकडे त्यांचा समान वयाच्या पार्टनरशी नाते जुळवण्याचा कल दिसतो, तर दुसरीकडे काही मुली(married) विवाहित पुरुषांबद्दल विशेष आकर्षण बाळगतात. हा विषय अनेक प्रश्न निर्माण करतो. का काही मुलींना विवाहित पुरुषांबद्दल आकर्षण नेमके वाटते तरी का? त्यामागे मानसिकता, वर्तन, किंवा सामाजिक परिस्थितींचा कसा परिणाम होतो? या लेखात आपण या प्रश्नाची सखोल चिकित्सा करू आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून या विषयाचा आढावा घेऊया.
तर दुसरीकडे लग्नानंतर (married)पुरूष आणि स्त्री दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. दोघांनाही त्यांच्या त्या सर्व सवयी बदलाव्या लागतात, ज्यामुळे त्याचा लाइफ पार्टनर दुखावू शकतो. अशावेळी आपल्या सवयी बदलात्ना सर्वाधिक त्रास स्त्रियांना होतो कारण लग्नानंतर त्यांना माहेर सोडून दुस-या घरात अॅडजस्ट करावे लागते.
अशा परिस्थितीत अचानक लग्नानंतर त्यांना त्यांच्या माहेरच्या सर्वच सवयी सुधारणे आणि सासू, सासरे, नव-याच्या इच्छेप्रमाणे वागणे खूप अवघड वाटते. कुठेतरी त्यांच्या मनात सल असते की लग्न झाल्यामुळे त्यांना माहेर सोडावे लागले. लग्नानंतर पुरुषांनी बायकोशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीकडे आणि बायकोने अन्य पुरूषाकडे पहायचंच नाही, बोलायचं नाही वा स्तुती करायचं नाही असं ठरलं तर तो खरंच एक मोठा अन्याय ठरेल.
कोणाकडे आकर्षित होणे वा एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे यात चुकीचे तोवर नाही जोवर तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात आणि आपल्या नात्याचा आदर करता आहात. पण अनेकदा मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते. पण कधी विचार केला आहे की यामागचे कारण काय आहे? विवाहित स्त्रियांना दुसरे पुरूष त्यांच्या स्वतःच्या नव-यापेक्षा अधिक आकर्षक का वाटतात? चला जाणून घेऊया काही आश्चर्यचकित करणारी पण तितकीच साधीशी कारणे!
जबाबदारी आणि स्थिर आयुष्य
विवाहित पुरुष सहसा त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी जागरूक असतात. ते आयुष्याला गांभीर्याने घेतात, ज्यामुळे त्यांच्याकडे निर्णयक्षमता अधिक असते. आजची तरुण पिढी, विशेषतः मुली, आपल्या जोडीदारामध्ये स्थिरता आणि जबाबदारी शोधतात. विवाहित पुरुषांकडे या दोन्ही गोष्टी असतात, त्यामुळे ते अधिक विश्वासार्ह वाटतात. बऱ्याच तरुण मुली आपल्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची अपेक्षा करतात. विवाहित पुरुष त्यांचा अनुभव आणि मॅच्युरिटीमुळे हा आधार देऊ शकतात. आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता हे देखील मोठे आकर्षण ठरते.
मॅच्युरिटी आणि जीवनाचा अनुभव
विवाहित पुरुषांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतारांचा सामना केलेला असतो. त्यामुळे त्यांची मॅच्युरिटी आणि नातेसंबंधांबद्दलची समज अधिक असते. हीच समज तरुण मुलींना आकर्षित करते, कारण त्या त्यांच्या आयुष्यात मॅच्युरिटीचा शोध घेत असतात. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि समस्या सोडवण्याची क्षमता आवश्यक आहे, जे विवाहित पुरुषांकडे जास्त प्रमाणात आढळते. तरुण मुली कधी कधी आपल्या वयाच्या जोडीदारांशी संवाद साधताना भावनिक ओढ न वाटल्याने अधिक अनुभवी व्यक्तीकडे वळतात.
सामाजिक प्रतिष्ठा आणि यश
आजच्या समाजात विवाहित पुरुषांना अधिक प्रतिष्ठित मानले जाते. त्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक यशामुळे ते आदरणीय वाटतात. या प्रतिष्ठेमुळे ते मुलींना आकर्षक वाटतात. तरुण पिढीमध्ये स्वाभाविक आकर्षण म्हणून प्रतिष्ठित व्यक्तींना महत्त्व दिले जाते. विवाहित पुरुषांचे व्यक्तिमत्त्व एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व असल्याचे आपल्याकडे मानले जाते, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
आकर्षण
“मनाला ज्या गोष्टी उपलब्ध नाहीत, त्या अधिक आकर्षक वाटतात” हा सिद्धांत इथे लागू होतो. विवाहित पुरुष सहज उपलब्ध नसल्यामुळे मुली त्यांच्याकडे आकर्षित होतात. हा एक मानसिक खेळ असतो, ज्यामध्ये काही मुली विवाहित पुरुषांच्या जीवनशैलीकडे आकर्षित होतात. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे “मास्क्युलिन” आणि “परिपूर्ण व्यक्ती” यांच्याबाबत एक आयडीयलीझम निर्माण होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व विवाहित पुरुषांशी अधिक जुळते.. वास्तविक आयुष्यात, हे आकर्षण अनेकदा अडचणी निर्माण करू शकते, ज्याची जाणीव तरुण पिढीला असायला हवी.
भावनिक आणि मानसिकरित्या खंबीर
विवाहित पुरुष त्यांचे नाते कसे टिकवावे आणि जोडीदाराला कसे आधार द्यावे याबाबत जाणकार असतात. तरुण मुली अनेकदा भावनिक अस्थिरतेमुळे किंवा नात्यातील गोंधळामुळे विवाहित पुरुषांकडे वळतात. आजची तरुणाई मानसिक आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहे आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून भावनिक समतोल हवा असतो. विवाहित पुरुषांकडे भावनिक समज अधिक असते, ज्यामुळे ते तरुण मुलींना योग्य वाटतात.
काही मुली विवाहित पुरुषांकडे आकर्षित होण्यामागे विविध मानसिक, सामाजिक, आणि भावनिक कारणे असतात. आजच्या तरुणाईसाठी हा विषय केवळ आकर्षणापुरता मर्यादित नसून, नातेसंबंधांबद्दलच्या त्यांच्याच विचारसरणीचे प्रतिक आहे. परंतु, या नात्यांचे परिणाम आणि सामाजिक अडचणी लक्षात घेऊन विवेकी निर्णय घेणे गरजेचे आहे. आकर्षण कधीही चुकीचे नसते, परंतु त्यामागील कारणे समजून घेतल्यास अधिक उत्तम!
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना मिळणार ३००० रुपये; समोर आली मोठी अपडेट
“25व्या वर्षी लग्न केले, पण…” तेजश्री प्रधानने लग्नावर व्यक्त केलं मत
बाबासाहेबांच्याविषयी वक्तव्य राजकीय “शहा”णपण केव्हा येणार?