BSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका!

काही महिन्यांपूर्वी जिओ मागोमाग एअरटेल, व्हिआयसह इतर कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे(Mobile recharge) दर वाढवल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली होती. यादरम्यान बीएसएनएल या टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर कमी केल्याने जिओ, एअरटेल, व्हिआय कंपनीच्या वापरकर्त्यांनी बीएसएनएलला मोठी पसंती दिली होती. त्यामुळे नावाजलेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना धक्का बसला होता. तर आता पुन्हा बीएसएनएलने नवा प्लॅन अस्तित्वात आणला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

सध्या अनेकांना इंटरनेटच्या जास्त वापरामुळे काहीवेळा मोबाइल प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा देखील कमी पडतो. त्यामुळे बीएसएनएलने नवा(Mobile recharge) रिचार्ज प्लान उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला 5000GB डेटा मिळू शकणार आहे.

बीएसएनएलने ब्रॉडबँड प्लॅन आणला आहे. यामुळे ग्राहकांना कमी खर्चात हाय स्पीड अनलिमिटेड डेटा मिळू शकणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps चा स्पीड मिळतो. याचा अर्थ, आपण कोणत्याही तणावाशिवाय अवजड काम सहजपणे करू शकता.

बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन, जो जिओ एअरटेलचे टेन्शन वाढवत आहे, सोबतच उत्तम OTT फायदेही देतो. या कंपनीमध्ये, ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार, लायन्स गेट, वूट ॲप, सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5 प्रीमियम, हंगामा तसेच शेमारू मी आणि याप टीव्हीसह अनेक ॲप्सचे विनामूल्य सदस्यता मिळते. याचा अर्थ असा की, बीएसएनएल तुम्हाला अनलिमिटेड डेटा देत नाही तर ओटीटीच्या स्वतंत्र खर्चातही बचत करत आहे.

हेही वाचा :

जसप्रीत बुमराह करणार टीम इंडियाचं नेतृत्व?

शहापूर थरार: महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू

2025 मध्ये ‘या’ राशींना होणार बक्कळ लाभ, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार