बॉलिवुडचा स्टार(Entertainment news) सलमान खानला कोण ओळखत नाही. भारतासह जगभरात त्याचे लाखोंनी चाहते आहेत. तो घराबाहेर निघाला की त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची रांग लागते. दुसरी गोष्ट म्हणजे बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळख असलेला सलमान खान अजूनही बॅचलर असल्यामुळे आजदेखील अनेत तरुणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. दिल्लीमध्ये मात्र याच सलमान खानला विचित्र अनुभव आला होता. दिल्लीत एका हॉटेलमध्ये एका तरुणीने सलमान खानच्या थेट कानशिलात लगावली होती.
ही घटना साधारण 15 वर्षांपूर्वीची आहे. दिल्लीमध्ये त्याला एका अनोळख्या मुलीने थेट कानाखली मारली होती.हा किस्सा 2009 सालातील आहे. तेव्हा (Entertainment news)सलमान खान त्याचा भाऊ सोहेल खान, सुष्मिता सेन आणि शिबानी कश्यप यांच्यासोबत दिल्लीतील एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. याच वेळी दारुच्या नशेत एक मुलगी त्यांच्याजवळ आली होती. तिने तिथे चांगलाच राडा घातला होता. शिवीगाळही केली होती. सोबतच दारुच्या नशेत तिने सलमान खानला थेट कानाखाली मारली होती.
या तरुणीने थेट सलमान खानच्या कानशीलात लगावल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. विशेष म्हणजे या कृतीचा सलमान खानलाही चांगलाच राग आला होता. या गदारोळात सलमान खानचा बॉडीगार्ड आला होता. पण ती मुलगी दारुच्या नशेत असल्यामुळे सलमानने त्या मुलीला काहीही केलं नाही.
दरम्यान, सलमान खानचा लवकरच सिकंदर नावाचा बिग बजेट चित्रपट येणार आहे. त्याआधी त्याचा टायगर-3 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत दाक्षिणात्त्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. 2025 मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
अरविंद केजरीवाल यापुढे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत; काँग्रेसच्या बड्या नेत्याने डिवचलं
ठाकरे बंधू एकत्र कारण काय?
“काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अनादर करण्याची परंपरा कायम ठेवली” – एकनाथ शिंदे