टीम इंडियाने(Team India) बांगलादेशवर मोठा विजय मिळवून अंडर 19 महिला आशिया कप 2024 चं (U19 Asia Cup 2024) विजेतेपद जिंकलं. रविवारी 22 डिसेंबर रोजी कुआलालम्पुरच्या बयूमास ओवलच्या फायनल सामन्यात भारताने बांगलादेशवर 41 धावांनी विजय मिळवला. फायनल सामन्यासाठी बांगलादेशच्या संघाला विजयासाठी टीम इंडियाने 118 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान असताना बांगलादेशची टीम केवळ 76 धावा करू शकली. त्यामुळे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला अंडर 19 आशिया कपचं विजेतेपद जिंकण्याचा मान भारताने पटकावला.
अंडर 19 महिला आशिया कप 2024 च्या सुरुवातीला झालेला टॉस बांगलादेशने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यामुळे(Team India) टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. यावेळी टीम इंडियाने 7 विकेट गमावून 117 धावा केल्या.
यावेळी गोंगाडी त्रिशाने 47 बॉलवर 52 धावा केल्या. तर मिथिला विनोदने 17, कर्णधार निकी प्रसादने 12, आयुषी शुक्लाने 10 धावा केल्या. बांगलादेशकडून फरजाना इस्मिनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर फरजाना इस्मिनला दोन तर हबीबा इस्लामला एक विकेट मिळवण्यात यश आले.
बांगलादेशला विजयासाठी 118 धावांचे टार्गेट असताना बांगलादेश 18.3 ओव्हरमध्ये 76 धावा करू शकली. विकेटकीपर जुएरिया फिरदौसने 30 बॉलमध्ये सर्वाधिक 22 धावा केल्या तर फहोमिदा चोयाने 18 धावा केल्या. तर याशिवाय इतर कोणताही फलंदाज दोन अंकी धावसंख्या करू शकला नाही. टीम इंडियाकडून गोलंदाज आयुषी शुक्लाने तीन, सोनम यादव आणि परुणिका सिसोदियाने प्रत्येकी 2 विकेट्स तर वीजे जोशिथाने एक विकेट घेतली.
भारताची प्लेईंग 11:
गोंगाडी तृषा, कमलिनी (विकेटकीपर), सानिका चालके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, वीजे जोशिथा, शबनम शकील, सोनम यादव, परुणिका सिसौदिया.
बांगलादेशची प्लेईंग 11:
फहोमिदा चोया, मोसम्मात ईवा, सुमैया अख्थेर, जुएरिया फिरदौस (विकेटकीपर), सुमैया अक्तेर (कर्णधार), सादिया अख्तर जन्नतुल मौआ, हबीबा इस्लाम, फरजाना इस्मिन, निशिता अक्तेर निशी, अनीसा अक्तेर सोबा.
हेही वाचा :
ठाकरे बंधू एकत्र कारण काय?
अरविंद केजरीवाल यापुढे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत; काँग्रेसच्या बड्या नेत्याने डिवचलं
ती आली, राडा घातला अन् थेट सलमानच्या कानाखाली मारली…