महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत.या योजनेत लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहेत. या योजनेत आता लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांचे बँक खाते (bank account)आणि आधार लिंक आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत आधार कार्ड आणि लिंक नसल्याने जवळपास १६ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत. मात्र, त्या महिलांनी आता आधार आणि (bank account)बँक अकाउंट लिंक केले आहेत. त्यामुळे त्यांना आता पैसे मिळणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झाल्यानंतर २१०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. या योजनेत आता ज्या महिलांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले त्यांना पैसे मिळणार आहेत. मात्र, मागील महिन्याचे हप्ते आले नसतील तर या योजनेत ते रखडलेले पैसे मिळणार का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या योजनेत आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक झाले असेल तर या महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांना प्रश्न होता. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेर महिन्यात येत्या आठवड्यात पैसे येऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा :
बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने जिंकला आशिया कप, मिळवला ऐतिहासिक विजय
ठाकरे बंधू एकत्र कारण काय?
ती आली, राडा घातला अन् थेट सलमानच्या कानाखाली मारली…