महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात (Political news)महायुतीची पुन्हा सत्ता येण्यात मोठा वाटा होता. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
लाभार्थी महिलांना दर महिन्याला १ हजार रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. तसंच हे मानधन २१०० रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. आता या घोषणेनंतर(Political news) दिल्लीच्या लाडक्या बहीणी सत्तेच्या चव्या ‘आप’कडे सोपवतील का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे भाजप आणि महायुतीला महाराष्ट्र तसंच मध्यप्रदेशच्या निवडणुकीत यश मिळालं होतं. तसंच आता आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करू बघत आहे. याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती, की दिल्लीत त्यांचं सरकार आलं तर तेथे देखील लाडकी बहीण योजना लागू केली जाईल.
या योजनेचे फॉर्म भरण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. यात लाभार्थी महिलांना सध्या १ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आता दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकांत लाडक्या बहिणींची जादू दिसेल का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
210 रुपये गुंतवा अन् वर्षाला मिळवा 60 हजार रुपये…
तुफान राडा! कॉलेजच्या आवारात तरुणींची जोरदार हाणामारी; एकमेकींना धु धु धुतले… Video Viral
महिना ₹1.77 लाख पगारासह ESIC मध्ये सुवर्णसंधी उपलब्ध!