मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या(political) नेतृत्वाखालील महायुतीने दणदणीत विजय मिळवला. महाआघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये भाजपची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती, मात्र असे असतानाही आधी मुख्यमंत्रिपदाची निवड आणि नंतर खात्यांच्या वाटपात भाजपला मोठा संघर्ष करावा लागला. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काही मागण्यांसाठी केलेला आग्रह हे त्यामागचे प्रमुख कारण होते.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना भाजपने मित्रपक्षांशी काही करार केले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागा जिंकल्या. भाजपने एकहाती 132 जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवली. तर MVA ला मोठा धक्का बसला होता. शिवसेनेला ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादीला (शरद पवार गट) फक्त 10 जागा मिळाल्या.
विधानसभा(political) निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या हिशोबाने भाजपला 20 मंत्रीपदे मिळाली तर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे मिळाली. पण निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यामुळे राजकारणच ढवळून निघाले होते. खातेवाटपावरून तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. एकनाथ शिंदेंनी गृहखात्यासाठी आग्रह धरला होता. तर दुसरीकडे अजित पवारांच्या गोटातही खातेवाटपावरून चढाओढ सुरू होती.
या सर्व गदारोळात 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला. तर मलाईदार खाते मिळण्यासाठी महायुतीतील घटकपक्षांच्या नेत्यामंध्ये आपापसात मोठं भांडण सुरू असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली.भाजपमधील उच्चस्तरीय नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असल्याने, शिवसेनेने भाजपवर राष्ट्रवादीपेक्षा चांगले खाते मिळविण्यासाठी दबाव आणला होता.
गृहखाते न मिळाल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज होते. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा आग्रह होता. पण मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांनी गृहखात्याची मागणी केली होती. पण भाजपने गृहखाते देण्यास त्यांना स्पष्ट नकार दिला.त्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी समजूत घातल्यानंतर एकनाथ शिंदे कसेतरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्यासाठी तयार झाले.
एकनाथ शिंदे सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहखाते होते, त्यामुळे फडणवीस सरकारमध्येही गृहखाते आपल्याला मिळावे अशी शिंदेंची इच्छा होती. मात्र भाजप कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर खातेवाटप झाले तेव्हा भाजपने गृहखाते स्वत:कडे ठेवले.
एकनाथ शिंदे देखील शहरी विकास, महसूल आणि पीडब्ल्यूडी सारख्या मलईदार मंत्रालयांची मागणी करत होते आणि त्यामुळे खातेवाटपात अनेक अडचणी येत होत्या. याशिवाय शिवसेनेने फडणवीस सरकारमध्ये 13 कॅबिनेट मंत्र्यांची पदे मागितली आणि महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सभापतीपदही मागितले, मात्र प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भाजपने 12 मंत्रीपदे शिवसेनेला देण्याचे मान्य केले. त्यानंतर भाजपचे राम शिंदेंना विधानपरिषदेचे सभापतीपद देण्यात आले.
मात्र एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दबावामुळे भाजपला(political) गृहनिर्माण आणि पीडब्ल्यूडीसारखे मोठे आणि मलईदार खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावे लागले. उद्योग विभागाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला आपल्या एका आमदाराला उद्योगमंत्री बनवायचे होते पण शिवसेनेच्या प्रचंड दबावानंतर हे पद त्यांच्याकडे गेले आणि उदय सामंत मंत्री झाले.
मुख्यमंत्री कोण होणार यावरून महाराष्ट्रात भांडण सुरू असताना एकनाथ शिंदे संतापले आणि त्यांच्या गावी निघून गेले. भाजपच्या महाराष्ट्र युनिटने आणि उच्च नेतृत्वाने खूप समजावून सांगितल्यानंतरच ते उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. त्यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीला अर्थखाते तसेच कृषी, सहकार, वैद्यकीय आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास आणि मदत व पुनर्वसन अशी काही महत्त्वाची खाती मिळाल्याने याचा फायदा अजित पवारांना झाल्याचे दिसते.
हेही वाचा :
1 जानेवारीपासून या स्मार्टफोन्समध्ये बंद होणार WhatsApp!
जिल्ह्यात दरवर्षी २५०० कोटींची कर्जे, शेती अर्थव्यवस्था
कॅप्टनची करामत! एका हाताने पकडलेला हरमनप्रीतचा अप्रतिम कॅच