खेळता खेळता घडली भयानक घटना; चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…; VIDEO

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ(VIDEO) पाहायला मिळतात. अनेकदा धक्कादायक अंगावर काटा आणणारे अपघातांचे आणि स्टंटचे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. तसेच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

या व्हिडीओने(VIDEO) मोठ्या प्रमाणात लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान मुलं रस्त्यावर खेळत असताना झालेल्या भयंकर घटनेचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, अशा घटना वाहनचालकांच्या किंवा इतरांच्या निष्काळजीपणामुळे कशा होतात, याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. हा व्हिडिओ कुठाला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

व्हिडीओत तुम्हीही पाहू शकता की, एका रस्त्याच्या कडेला तीन-चार लहान मुले खेळत आहेत. तिथेच एका बाजूला बाईक पार्क केलेली आहे. खेळता खेळता एका मुलाचा बाईकला धक्का लागतो आणि ती थेट त्याच्या अंगावर कोसळते. बाईकखाली सापडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी तिथली मुले घाबरून सैरावैरा पळत मदतीसाठी मोठ्या माणसांचा शोध घेतात. काही वेळातच एक महिला आणि पुरुष घटनास्थळी धावून येतात. त्यांनी बाईक उचलून त्या मुलाला बाहेर काढले. सुदैवाने त्या मुलाला काहीही होत नाही. मात्र, या व्हिडिओवरुन हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मुलांनी देखील खेळताना सावधानता बाळगली पाहिजे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @bikelover_h1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी पालकांच्या आणि वाहन पार्किंगसंबंधीच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, “बाईक चुकीच्या पद्धतीने उभी करण्यात आली होती.” तर दुसऱ्या युजरने, “पालकांचे लक्ष कुठे होते?” असा प्रश्न विचारला आहे. तसेच एकाने म्हटले आहे की, “नशीब वेळेत मदत मिळाली नाही तर मोठे नुकसान झाले असते.”

या घटनेने वाहन चालकांनी बाईक किंवा इतर वाहने योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे पार्क करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. तसेच, लहान मुलं रस्त्यावर खेळत असताना पालकांनी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. जागरूकता आणि सावधानता हेच अशा अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचे साधन आहे.

हेही वाचा :

सोमनाथ सुर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप…

भाजप की शिवसेना: राजकीय लढाईत कुणाची ताकद जास्त?

1 जानेवारीपासून या स्मार्टफोन्समध्ये बंद होणार WhatsApp!