भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलं होतं. यानंतर विनोद कांबळींना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात (medical)दाखल करण्यात आलं. विनोद कांबळे यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना ठाण्यातील आकृती रूग्णालयात भरती करण्यात आलं.
डॉक्टरांची (medical)टीम त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विनोद कांबळे यांच्या प्रकृतीबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. डॉक्टरांनी काही महत्वाच्या तपासण्या केल्यानंतर धक्कादायक माहिती दिली. विनोद कांबळींच्या मेंदूत रक्ताच्या गाठी आढळून आल्याचे त्याच्या मेडिकल रिपोर्टमधून समोर आले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सर्व आवश्यक चाचण्या केल्या जात असतानाही डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवलंय.
काही दिवसांपूर्वी रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीस्थळी बालपणीचा मित्र आणि दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर 52 वर्षीय हे नुकतेच चर्चेत आलं होतं. कार्यक्रमात विनोद कांबळी व्हिलचेअरवर बसलेला दिसला होता. तेव्हापासून चाहत्यांना देखील विनोदच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटू लागली होती.
रुग्णालयातील डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की तपासणी दरम्यान विनोदच्या मेंदूत रक्ताच्या गाठी दिसल्या. आजही त्याच्या काही तपासण्या होणार आहेत. रुग्णालयाचे प्रभारी डॉ. एस. सिंग यांनी कांबळीला आयुष्यभर मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या विनोद यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना मूत्रपिंडाचा संसर्ग झाला आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे अशी माहिती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा :
राहुल गांधी यांनी ठरवले परभणी पोलिसांना जात वादी
जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन, 90 व्या वर्षी पडद्यावरची अखेरची कथा”
“परत येणार 10 रुपयांचे रिचार्ज व्हाउचर? ग्राहकांना दिलासा”