ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(current political news) यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच छगन भुजबळ यांची नाराजी आणि परभणी, बीड येथील घटनांचा उल्लेख करत फडणवीसांना चॅलेंजही दिलं. आपण भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता. पण ज्याच्यावर एका खूनाच्या कटकारस्थानाचा संशय आहे अशा व्यक्तींना दूर ठेऊ शकत नाही. आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल. देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असे तर बीडमधील खऱ्या आरोपींनी पकडून दाखवा असे आव्हान संजय राऊतांनी दिलं.
राऊत पुढे म्हणाले, या देशामध्ये विरोधी पक्षाने, जनतेने, नागरिकाने काय करावं, कुठे जावं, काय बोलावं, काय खावं कोणत्या भूमिका मांडाव्या हे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस ठरवणार का ? या देशात लोकशाही आहे. महाराष्ट्राची(current political news) परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीस यांनी समजून घ्यावं.
मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे रोष आहे अशी लोकं आपल्या मंत्रिमंडळात आहेत आपण त्यांना घेतलं आहे. न्यायाच्या गोष्टी करत आहात स्वतः एकदा बीडला जा. गृहमंत्री म्हणून गेलात का एकदा बीडला ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीला गेले यामुळे आपलं पित्त का खवळावं ? राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिला आहे लोकसभेत संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी अमित शहा आणि आपण दिलेला नाही. जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा विरोधी पक्षनेते पद त्यांना मिळू दिले नाही.
आता लोकसभेच्या आकडेवारीनुसार आपलं बहुमत नाही हे आधी मान्य करा. मोदींना बहुमत नाही मोदी कुबड्यांवर आहेत. राहुल गांधी परभणीत आले आपण जायला पाहिजे होतं. गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते तिथे जाण्याची. भीती वाटते गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल आपण अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा :
सांगली अन् कोल्हापुरातील शेकडो महिलांची फसवणूक…
राहुल गांधी यांनी ठरवले परभणी पोलिसांना जात वादी
“विनोद कांबळीच्या आजाराबाबत मेडिकल अहवालातून मोठा खुलासा”
जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन, 90 व्या वर्षी पडद्यावरची अखेरची कथा”