स्कूटर चालवत असताना अचानक बेशुद्ध पडला व्यक्ती, हेल्मेट काढताच बाहेर निघाला भयावह जीव; Video

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल(viral) होत असत. इथे कधी स्टंट्सचे तर कधी अपघाताचे व्हिडिओ तर कधी हास्यापद व्हिडिओ देखील शेअर केले जातात. बऱ्याचदा इथे काही धक्कादायक आणि विचित्र गोष्टींचे व्हिडिओ देखील शेअर होतात, ज्यांना पाहून आपल्याला धक्का बसेल. सध्या असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे ज्यात एका व्यक्तीबरोबर एक थरारक घटना घडून आल्याचे दिसून आले. नक्की व्हिडिओत असे काय घडले? ते चला जाणून घेऊयात.

मानवी वस्ती विकसित झाल्यांनतर शहरातून अनेक प्राणी नाहीसे झाले, पण तरीही कधी कधी आपल्या नकळत आपल्याला हे प्राणी दिसून येतात. सध्याच्या व्हायरल(viral) व्हिडिओत देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. ही घटना दक्षिण भारतात घडली आहे, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

यात एक व्यक्ती स्कुटी चालवत असताना अचानक चालू रस्तावर बेशुद्ध पडतो. यानंतर त्याला काय झाले हे पाहण्यासाठी आजूबाजूची लोक त्याच्या दिशेने धाव घेतात आणि त्याचा हेल्मेट काढून बघतात. हेल्मेट काढताच त्याच्या अपघाताचे कारण समोर येते जे पाहून सर्वच लोक हादरून जातात. खरं तर, व्यक्तीच्या हेल्मेटमध्ये किंग कोब्रा लपून बसलेला असतो. त्या व्यक्तीने सापासोबत हेल्मेटही घातले आहे. ज्यामुळे सापाने दंश करताच तो रस्त्यात बेशुद्ध होऊन पडतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की, स्कूटर चालवताना व्यक्ती बेशुद्ध पडते. काही लोक त्याला उचलतात आणि लगेच गाडीत घेऊन जातात. त्याचे हेल्मेट काढल्यानंतर त्यामध्ये कोब्राचे बाळ लपल्याचे आढळून आले ज्याने त्या व्यक्तीच्या डोक्याला चावा घेतला आहे. हेल्मेटच्या आत कोब्रा असतो. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, बेबी कोब्रा कोब्रा सापापेक्षा जास्त विषारी आहे. त्यामुळे अनेकदा हेल्मेट, शूज किंवा इतर कोणतीही वस्तू पूर्णपणे नीट तपासल्यानंतरच त्यांना घालण्याचा सल्ला दिला जातो.

त्याचं झालं असं की, एका स्थानिक व्यक्तीने ऑफिसमध्ये हेल्मेट घालून ठेवलं होतं. संध्याकाळी घरी परतत असताना त्याने हेल्मेट घातले तेव्हा त्याला काही हालचाल जाणवली. त्यांना या सापाचा आधीच संशय असल्याने त्याने तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. प्रोफेशनल हँडलर्सने पाहिले तेव्हा आतून एक विषारी बेबी कोब्रा निघाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला असून यातील दृश्ये पाहून आता अनेक युजर्स आवाक् झाले आहेत.

या भयावह घटनेचा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो जिवंत आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझ्यासोबतही असेच घडले होते, गोवर किड्याने मला दोनदा हेल्मेटमध्ये चावले होते”.

हेही वाचा :

तुपासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, फायदे होण्याऐवजी शरीराचे होईल गंभीर नुकसान

महाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी

Rohit Sharma ची कसोटीतून निवृत्ती? सिलेक्टर अजित आगरकरांची कर्णधारासोबत चर्चा