केवळ स्मार्टफोन आल्यामुळे डिजिटल अरेस्ट चे प्रकार वाढले

(उत्तरार्ध) कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आम्ही घेतलेल्या स्पर्धेमध्ये तुमचा क्रमांक पहिला आला आहे. आपणास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. अधिक संपर्कासाठी आम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा असा संदेश देऊन शेकडो लोकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार स्मार्टफोन(smartphones) बाजारात आल्यानंतर वाढू लागले आहेत. या आणि इतर मार्गाचा अवलंब करून देशभरातील करोडो लोकांना अब्जावधी रुपयांचा गंडा घालण्याचा सिलसिला सुरू झाला असून, राज्य आणि केंद्र शासनाची चिंता त्यामुळे वाढलेली आहे.

बक्षिसाची रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी प्रक्रिया खर्च म्हणून आमच्या बँक खात्यावर अमुक इतकी रक्कम जमा करा असा संदेश आल्यानंतर शंभर पैकी किमान 25 लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात फसतात. याशिवाय इतर अनेक फसवणुकीचे प्रकार गुन्हेगारांनी शोधून काढले आहेत. 2024 मध्ये देशभरात 93 लाख लोकांच्या फायबर सेल कडे फिर्यादी दाखल झालेल्या आहेत.

मुंबईमध्ये 55 हजार सायबर तक्रारी दाखल झाले असून ठकसेनानी बाराशे हुन अधिक कोटी रुपयांना चुना लावलेला आहे तर पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 38 हजार लोकांच्या तक्रारी सायबर सेल कडे दाखल झालेल्या असून सुमारे 700 कोटी रुपयांची लूट संबंधित गुन्हेगारांनी केलेली आहे.

डिजिटल अरेस्ट अर्थात तांत्रिक अटक हा एक नवीन भयानक प्रकार गुन्हेगारांनी लुटीसाठी शोधून काढला आहे. आम्ही ईडी कडून आलो आहोत. तुम्ही शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे. त्याचा तपास करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे प्रत्यक्ष किंवा मोबाईलच्या(smartphones) माध्यमातून धमकी देऊन लाखो रुपये लुटले जातात.

कागलच्या राजश्री शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्या पत्नीशी थेट संपर्क साधून आम्ही तुम्हाला अटक करू शकतो अशी धमकी दिली आणि अटक टाळण्यासाठी वीस लाख रुपयांची रक्कम मागितली. सौ घाटगे यांनी घाबरून वीस लाख रुपये संबंधितांच्या बँक अकाउंट वर जमा केले. या गुन्ह्याची नोंद सायबर सेल कडे झालेली आहे.

आधी संबंधितांच्या मोबाईलवर(smartphones) किंवा व्हाट्सअप वर अटकेचा मेसेज टाकायचा आणि नंतर प्रत्यक्ष भेट घेऊन पैसे उकळायचे असे प्रकार वाढू लागले आहेत. आम्ही सीबीआयकडून आलो आहोत किंवा येणार आहोत, आम्हाला तुमची ईडी चौकशी करायची आहे, तुम्ही करोडो रुपयांचा आयकर भरलेला नाही, तुमच्यावर आम्ही कारवाई करू शकतो अशा प्रकारच्या धमक्या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या नावाने द्यायच्या आणि नंतर मांडवली करून लाखो रुपयांचा चुना लावायचा. हनी ट्रॅप हा सुद्धा फसवणुकीचा प्रकार आहे.

मोठे बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी यांना मोबाईल वरून मिस कॉल द्यायचा. संबंधित हा आपला मोबाईल चाळत असताना त्याला मिस कॉल दिसतो. तो संबंधिताला फोन करतो तेव्हा पलीकडून मादक आणि मधाळ भाषेत कुणीतरी एक तरुणी बोलत असते. ती तरुणी संभाषण वाढवत वाढवत त्याला आलिशान लॉज मध्ये किंवा हॉटेलमध्ये भेटण्याची ऑफर देते. संबंधित व्यक्ती त्या तरुणीला भेटण्यासाठी आली की मग बंद खोलीमध्ये त्या तरुणीकडून धमकी दिली जाते. तू माझ्यावर बलात्कार केला आहेस अशी फिर्याद मी पोलीस ठाण्याला देणार आहे. पोलिसांची अटक का टाळावयाची असेल तर दोन लाख पाच लाख रुपये दे अशी मागणी करून संबंधितांकडून ती उकळली जाते. याला हनी ट्रॅप म्हणून ओळखले जाते.

सध्या तरी डिजिटल अरेस्ट हा गुन्हे प्रकार वाढत चालला असून लक्षावधी लोक त्याला बळी पडू लागले आहेत. अशा प्रकारात पोलिसांच्या सायबर सेलकडे फिर्याद दिली तरी गुन्ह्याचा तपास सखोलपणे होईलच असे सांगता येत नाही. किंवा तपास केला जातो पण गुन्हेगार हाती लागत नाही.

त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास करणे पोलीस यंत्रणेला कठीण जात आहे. आम्ही येडी कडून आलो आहोत येणार आहोत, आयकर विभागाकडून आलो आहोत किंवा येणार आहोत, सीबीआयकडून येणार आहोत अशा प्रकारचे मेसेज आले तर ते आल्या क्षणी डिलीट करणे हा एकमेव खबरदारीचा उपाय शासनाकडून तथा पोलीस प्रशासनाकडून सध्या सांगितला जातो आहे.

आपला आधार कार्ड क्रमांक सांगू नका, बँकेचा अकाउंट नंबर सांगू नका, ओटीपी सांगू नका अशा सावधगिरीच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून तसेच वित्तीय संस्थांकडून केल्या जात आहेत. सावध राहा आणि सतर्क रहा हा एकच पर्याय स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या समोर आहे. तुम्ही सावध राहिला नाही, सतर्क राहिला नाही तर तुमची फसवणूक अटळ आहे.

हेही वाचा :

नववधूला जोरजोरात फुलं फेकून मारणाऱ्यांना भटजीने शिकवला धडा! स्टेजवरचा Video पाहाच

“खराब शॉटमुळे गावसकरांचे पंतवर ताशेरे, Video व्हायरल!”

ब्रेकअपचा बदला! राजेश खन्नांनी EX च्या घरासमोर काढली वरात, १७ वर्षांचा अबोला अन् मग काय घडलं?