महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही योजना(Yojana) आता वादाच्या भोवऱ्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी या योजनेबाबत एक मोठा दावा केला आहे. विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की, ही योजना केवळ निवडणुकीच्या हेतूने सुरू करण्यात आली होती आणि निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल.
लाडकी बहिण योजनेचा(Yojana) प्रयोग निवडणुकीच्या राजकारणासाठी केला गेला असल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीच्या राजकारणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल, हे नक्कीच आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
महायुती सरकारने जुलै महिन्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली होती. या योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आश्वासन दिलं होतं की सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात येतील.
निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी, यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे. अर्जदारांच्या उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर प्रमाणपत्र, निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी, जमिनीची मालकी यासारख्या अनेक निकषांवरून अर्जदारांची छाननी केली जाणार आहे.
विनायक राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या यशाबद्दल बोलताना असे म्हटले आहे की ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आणि यामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात मदत होईल.
हेही वाचा :
सलमान खानने ‘सिंकदर’च्या टीझरद्वारे लॉरेन्स बिश्नोईला दिली धमकी?
वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!
150 मतदारसंघांत गडबड, अजितदादा 20 मतांनी पराभूत; आ. जानकरांचा धक्कादायक दावा