“ट्रेलर रिलीज करा, नाहीतर…”, राम चरणच्या चाहत्याने ‘गेम चेंजर’ चित्रपटाबद्दल निर्मात्यांना दिली धमकी

टॉलिवूड सेलिब्रिटींची त्यांच्या चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ आहे. मग त्या आवडत्या सेलिब्रिटीचं मंदिर बनवणे असो, रिलीजच्या पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये(Theater) आवडत्या सेलिब्रिटी दुग्धाभिषेक करणे असो किंवा त्याचा चित्रपट पहिल्याच दिवशी जाऊन पाहणे असो…. अशा अनेक वेगवेगळ्या घटना तुम्ही आम्ही पाहिल्या आहेत आणि ऐकल्याही आहेत.

पण आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत, जिची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. येत्या १० जानेवारीला टॉलिवूड अभिनेता रामचरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट येतोय. त्याच्या ह्या चित्रपटाबद्दल त्याच्या एका चाहत्याने थेट ‘RIP लेटर’ लिहिलंय.

व्हायरल होत असलेल्या पत्रात एका चाहत्याने चित्रपटाच्या(Theater) निर्मात्यांना ट्रेलर लवकरात लवकर रिलीज करावा यासाठीच धमकी दिली आहे. हे धमकीचं पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत.

ट्रेलर रिलीजला जास्त वेळ लागत असल्यामुळे रामचरणच्या चाहत्याने चित्रपटाच्या निर्मात्याने सोशल मीडियावरून RIP लेटर लिहिलं आहे. यात त्याने ‘गेम चेंजर’च्या ट्रेलरबाबत कोणतेही अपडेट देत नसल्याची तक्रार केली आहे, त्यामुळे त्याला हे पाऊल उचलावे लागत आहे, असे त्याचे म्हणणे आहे. हे पत्र चाहत्याने तेलुगूमध्ये लिहिले आहे.

व्हायरल होत असलेल्या पत्रात चाहत्याने लिहिलंय की, “तुम्ही चाहत्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करताय. तुम्ही जर या महिन्याअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने गेम चेंजरच्या ट्रेलरबद्दल कोणतीही अपडेट किंवा सिनेमाचा ट्रेलरच जर रिलीज केला नाही, तर मला हे सांगण्यात अतिशय दुःख होतंय की, मी माझं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलेन.”

चाहत्याने लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. ‘RIP Letter’ असं त्याने त्या पत्राला शीर्षक दिलं होतं. ‘RIP लेटर’ लिहिणाऱ्या चाहत्याचं नाव ईश्वर असं आहे. सध्या सोशल मीडियावर ईश्वरने लिहिलेलं लेटर प्रचंड व्हायरल होत असून आता निर्माते चित्रपटाच्या ट्रेलरची पुढची अपडेट केव्हापर्यंत देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चित्रपटाचे कथानक कार्तिक सुब्बाराव यांनी लिहिले असून एस यू वेंकटेशन आणि विवेक यांची कथा आहे. दिल राजू आणि सिरिश चित्रपटाची निर्माती केली असून ‘शिवाजी द बॉस’ फेम शंकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे. कियारा आणि रामचरण व्यतिरिक्त चित्रपटात अंजली, समुथिराकणी, एसजे सूर्या, श्रीकांत, प्रकाश राज आणि सुनील देखील दिसणार आहेत. ‘गेम चेंजर’ सर्व दक्षिण भारतीय भाषा आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच १० जानेवारी २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

लाडकी बहिण योजना बंद होणार?; ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट!

काय सांगता!, १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली..; केजरीवालांचा भाजपवर आरोप