मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी(criminal) वाल्मिक कराडने काल सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यानंतर केज न्यायालयाने कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. मात्र आता वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत चौकशी सुरू आहे. तर, दुसरीकडे त्याचे कारनामे देखील समोर आले आहेत.
अशातच आता वाल्मिक कराडच्या(criminal) अनेक कारनाम्यांची सध्या चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडवर 1999 ते 2024 या मागील 25 वर्षात परळी शहर पोलीस ठाण्यासह, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे आणि केज पोलीस ठाणे अशा एकूण चार पोलीस ठाण्यात तब्बल 15 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
याशिवाय वाल्मिक कराडवर परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी व मारामारीचे 4 गुन्हे, खुनाचा प्रयत्न 1 गुन्हा, रस्त्यात अडवल्याचे 3 गुन्हे तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 2 गुन्हे असे एकूण मिळून 10 गुन्हे दाखल झालेले आहेत.
वाल्मिक कराडवर नेमके कोणते गुन्हे दाखल? :
– वाल्मिक कराडवर बर्दापूर पोलीस ठाण्यात 2019 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा देखील गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेला आहे.
– यासह वाल्मिक कराडवर खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे आहेत. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात 2024 मध्ये 1 गुन्हा दाखल आहे. तर 2006 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे.
– याशिवाय खुनाचा प्रयत्न करणे यामध्ये गोळीबार व मारहाण प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात 4 जुलै 2024 रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
– तसेच वाल्मिक कराडवर 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात 11 डिसेंबर 2024 रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
भारतीय संघात चाललेय काय! गौतम गंभीरचा संताप; खेळाडूंची जोरदार बाचाबाची
कोण आहे आर्यन खानची रुमर्ड गर्लफ्रेंड? जिच्यासोबत दिसला आर्यन खान
मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; खत आणि पीकविमा योजनांवर मिळणार जास्त सबसिडी